शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस जास्त तरीही धरणातील पाणीसाठा मात्र कमी!

By admin | Updated: July 27, 2016 00:31 IST

जोर मंदावला : गेल्या वर्षीच्या बरोबरीसाठी सात टीएमसीची गरज; थेंब-थेंब पाण्याने कोयना धरण लागले भरू

सातारा/पाटण : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने पाठ फिरवल्याने धरणांतील पाण्यात म्हणावी अशी वाढ होत नाही. त्यामुळे ‘थेंबे-थेंबे कोयना भरे’ अशी अवस्था कोयना धरणाची झाली आहे. धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत सात टीएमसीने पाणी कमी आहे. राज्याच्या सर्वच भागात वेळेपूर्वी आणि पर्जन्यमानाच्या सरासरी १०५ टक्के पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. त्यामुळे दुष्काळी जनतेच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, पावसाने लहरीपणा दाखविण्याची संधी यंदाही सोडली नाही. जिल्ह्यात सरासरी ७ जूनपासून पावसाला सुरुवात होते. जिल्ह्याचा पश्चिम भाग असलेल्या महाबळेश्वर, पाटण, नवजा, कोयना येथे विक्रमी पाऊस पडत असतो. यातील कोयना, नवजा आणि महाबळेश्वरमध्ये शंभर मिलिमीटर पाऊस चोवीस तासांत पडला तरी विशेष वाटत नाही; पण यंदा चक्क जून महिना कोरडा गेला. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. काही दिवसांमध्येच कोयनेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली. पाणी पातळीतवाढ होण्याचे प्रमाणही आश्चर्यकारक होते. चोवीस तासांत दोन टीएमसी, पाच टीएमसीने वाढ होत होती. त्यामुळे महिनाभरात कोयना भरेल, अशी शक्यता होती. शंभर-दीडशे मिलिमीटर पाऊस चोवीस तासांत पडणाऱ्या महाबळेश्वर, कोयना अन् नवजामध्ये गेल्या काही दिवसांपासून दहा मिलिमीटरच्या आतच पाऊस पडत आहे. (प्रतिनिधी) केवळ ५६.५४ टीएमसी पाणी ४कोयना धरण क्षेत्रात अपेक्षेप्रमाणे पाऊस झालाच नाही. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत सात टीएमसीने पाणीसाठा कमी आहे. मंगळवारी सायंकाळी पाच वाजता झालेल्या चोवीस तासांत धरणात केवळ ५६.५४ टीएमसी होता. तर गतवर्षी याच दिवशी तो ६३.८८ होता. ४मंगळवारी सायंकाळी पाच वाजता झालेल्या चोवीस तासांत पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये असा : कोयना २, नवजा ७, महाबळेश्वर ५. गेले पाणी कुणीकडे? ४गेल्या वर्षीच्या तुलनेत धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे. तरीही धरणातील पाणी कमी आहे. त्यामुळे एवढ्या पडलेल्या पावसाचे पाणी कुणीकडे गेले हा प्रश्न आहे. धरण क्षेत्रात पडलेला एकूण पाऊस कंसात गेल्यावर्षी पडलेला मिलिमीटरमध्ये असा : कोयना २२९० (१,७५५), नवजा : २,९३१ (१,९१८), महाबळेश्वर २,३०३ (१,९३६) ४जिल्ह्यातील चार धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा झाला आहे. यामध्ये कोयना, कण्हेर, मोरणा-गुरेघर, तारळी यांचा समावेश आहे.