पन्हाळा : पन्हाळा आणि परिसराला दुपारी चारनंतर विजेच्या कडकडाट आणि गारांसह पावसाने झोडपले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पन्हाळा बसस्थानक आणि सखल भागात पाणीच पाणी साचले होते. वादळी पावसाने तालुक्यात शेतीसह घरांचे मोठे नुकसान झाले. गारांच्या तडाख्याने टोमॅटो, वांगी, मिरची, फ्लॉवर या पिकांसह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. काहींच्या घरावरील पत्रे, छपरे व अनेकांच्या घरांची कौले उडून गेल्याने प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले.
पन्हाळ्याला पावसाने झोडपले
By admin | Updated: May 3, 2014 14:37 IST