शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

नवजा, महाबळेश्वरचा पाऊस चार हजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:44 IST

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात सध्या तुरळक स्वरुपात पाऊस होत असला तरी आतापर्यंत नवजा आणि महाबळेश्वरला ४ हजार मिलीमीटरवर ...

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात सध्या तुरळक स्वरुपात पाऊस होत असला तरी आतापर्यंत नवजा आणि महाबळेश्वरला ४ हजार मिलीमीटरवर पर्जन्यमान झाले आहे. तर कोयनेला आतापर्यंत ३४३० मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात तीन आठवड्यापूर्वी धुवाधार पाऊस झाला होता. कोयना, नवजा, महाबळेश्वर, तापोळा, बामणोली या भागात तर तुफान वृष्टी झाली. यामुळे शेतीचे नुकसान झाले. तसेच रस्ते, पूल वाहून गेले. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर या अतिवृष्टीमुळे जिल्ह्याच्या पश्चिम भागातील प्रमुख धरणांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक आली. कोयना धरणात तर एका दिवसात १६ टीएमसीवर पाण्याची आवक झाली. कोयना धरणाच्या इतिहासातील हा एक विक्रम ठरला. त्यामुळे अवघ्या काही दिवसात कोयना धरणातील पाणीसाठा ९० टीएमसीच्यावर पोहोचला होता. तर कण्हेर, उरमोडी, धोम, बलकवडी, तारळी या सारख्या धरणांतही मोठ्या प्रमाणात पाणी आले. सध्या पश्चिम भागात पाऊस कमी झाल्याने धरणांत येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली आहे. त्यामुळे कोयना वगळता अन्य धरणांतून विसर्ग बंद करण्यात आलेला आहे.

गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला अवघा ८ मिलीमीटर पाऊस झाला. तर नवजा येथे १४ आणि महाबळेश्वरला सकाळपर्यंत ७ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. यावर्षी जुलै महिन्यात अवघ्या तीन दिवसांत पश्चिम भागात तुफान पाऊस पडला होता. यामुळे कोयना, नवजा आणि महाबळेश्वरच्या पावसाने नवा विक्रम केला. तर सध्या पावसाचे प्रमाण तुरळक असले तरी आतापर्यंत कोयना, नवजा आणि महाबळेश्वरला मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. कोयना येथे जूनपासून आतापर्यंत ३४३० मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. तर नवजाला ४३८८ आणि महाबळेश्वरला ४४८० मिलीमीटर पर्जन्यमान झाले आहे. पावसाळ्याचा अजून दीड महिना बाकी आहे. त्यामुळे या तीनही ठिकाणचे पर्जन्यमान ५ हजार मिलीमीटरचा टप्पा ओलांडेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

चौकट :

कोयनेतील साठा ९१ टीएमसीजवळ...

पश्चिम भागात तुरळक प्रमाणात पाऊस होत आहे. त्यामुळे धरणांत येणाऱ्या पाण्याची आवक मंदावलेली आहे. त्यामुळे कोयना वगळता इतर धरणांतून विसर्ग बंद करण्यात आलेला आहे. गुरुवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात ९०.८८ टीएमसी एवढा पाणीसाठा झाला होता. तर धरणात २१०० क्युसेक पाण्याची आवक होत होती. धरणाच्या दरवाजातील विसर्ग आठ दिवसांपासून बंद आहे. सध्या फक्त पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

.......................................................