शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
3
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
4
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
5
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
6
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
7
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
8
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
9
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
10
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
11
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
12
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
13
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
14
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
15
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
16
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
18
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
19
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
20
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई

पावसानं मारलं; धोम-बलकवडीनं तारल

By admin | Updated: November 21, 2015 00:24 IST

खंडाळा तालुका : यावर्षी सरासरीपेक्षा पर्जन्यमान कमी तरीही अनेक गावांना वरदान, तलावांबरोबर विहिरीही भरल्यां

दशरथ ननावरे-- खंडाळा तालुक्यात दरवर्षीपेक्षा सरासरी पाऊस कमी पडला आहे. जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त इतर तालुक्यातून पाण्याची टंचाई भासत आहे. मात्र, खंडाळा तालुक्यात धोम-बलकवडीच्या पाण्यामुळे अद्याप तरी टंचाई जाणवत नाही. त्यामुळे पावसाने जरी मारलं असलं तरी धोम-बलकवडीने तारलं आहे. खंडाळा तालुक्यासाठी धोम-बलकवडी वरदायिनी ठरत आहे. तालुक्यातील तलाव, विहिरी भरल्या आहेत.खंडाळा हा दुष्काळग्रस्त तालुका म्हणून गणला जात होता. डिसेंबर उजाडला की गावोगावी विशेषत: पूर्व भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत जात होता. मात्र, वाई तालुक्यातील धोम-बलकवडी धरणाचे पाणी कालव्याने खंडाळा तालुक्याच्या माळरानावरून वाहू लागले आणि तालुक्याच्या पाण्याच्या प्रश्नाचे चित्र पालटले. धोम-बलकवडीच्या पाण्यामुळे असवली, अजनुज, म्हावशी, वाण्याचीवाडी, खंडाळा, हरळी, धावडवाडी, अहिरे, घाटदरे, बोरी, पाडळी, सुखेड, खेड बु।।, कोपर्डे, निंबोडी या पूर्व भागातील गावांना वरदान ठरले आहे. गावोगावी असणारे तलाव, विहिरी या पाण्यामुळे भरल्या गेल्याने केवळ पिण्याच्याच पाण्याचा नाही तर शेती पाण्याचाही प्रश्न निकालात निघाला आहे. कधी काळी या भागात मूग, मटकी खेरीज काहीच पिकले जात नव्हते. तिथे उसासारखी पिकांचे उत्पादन वाढले आहे. तालुक्यातील बहुतांशी गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता; मात्र आता कुठेही टँकर द्यावा लागत नाही. धोम-बलकवडीचे पाणी सोडण्याचे रोटेशन २१ दिवसांचे असते. त्यामुळे गरजेनुसार पाणी उपलब्ध होते. ठिकठिकाणी तलाव भरल्याने शेती पाणीही मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. तालुक्याचा दुष्काळाचा कलंक कायमस्वरूपी पुसून टाकण्यात धोम-बलकवडी प्रकल्पाचे उद्गाते राज्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि आमदार मकरंद पाटील यांचे योगदान आहे. या पाण्यामुळे शेती समृद्ध तर बनलीच आहे. पण, त्याचबरोबर उद्योगधंद्यांनाही याचा उपयोग होत आहे.खंडाळा तालुक्यातील गावोगावचा पाण्याच्या टंचाईचा प्रश्न धोम-बलकवडीमुळे मिटला आहे. योग्य वेळेत धरणाचे पाणी मिळाल्याने शेतीला फायदा झाला आहे. लोकांनी मिळालेल्या पाण्याचा वापर योग्यरीतीने आणि काटकसरीने करायला हवा.- आमदार मकरंद पाटीलधोम-बलकवडीमुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर झाली तसेच शेतीला पाणी मिळाले. शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक उन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. पोटपाटाने शिवारात पाणी खेळल्याने शेती पिके जोरात आहेत.-शांतीलाल दशरथे, घाटदरेसाखर कारखान्याला धोमचे वरदान...खंडाळा तालुक्यात सहकारी साखर कारखाना उभा राहत आहे. या कारखान्यासाठी लागणारा ऊस तालुक्यातच उत्पादित होत आहे. ५० ते ७० हजार टनांवरून तालुक्यात उसाचे उत्पादन पाच लाख टनांपर्यंत वाढले आहे. याचा फायदा कारखान्याला होणार आहे. कारखान्यासाठी धोम-बलकवडी प्रकल्प वरदान ठरणार आहे.