शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस आला धावून... बळीराजा गेला सुखावून!

By admin | Updated: September 13, 2015 22:18 IST

धरणी आईची माया, कशी जाईल वाया

खटाव : सातारा जिल्हा हा पावसाळी म्हणून ओळखला जातो. महाबळेश्वर, पाचगणी, वाई, सातारा, पाटण, कोयना, बामणोली, नवजा अशी एक नाही अनेक गावांची नावे मुसळधार पावसांच्या यादीत घेतली जातात. या जिल्ह्याच्या पूर्वीचा खटाव मात्र कायम दुष्काळी म्हणून ओळखला जातो. याच दुष्काळी पट्ट्यावर वरुणराजा चांगलाच खूश झाला आहे. गेल्या आठ दिवसांपासून परतीचा पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे शनिवारी भरपावसात बळीराजाची पावले शेताकडे वळाली आहेत.खटाव, माण तालुक्यांतील शेतकरी परिस्थितीनं ग्रासला आहे. कितीही नैसर्गिक संकटं आली तरी तो कधीच खचला नाही. पुन्हा जिद्दीनं उभारत परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी उभा राहत असतो. खटाव तालुक्यात गेल्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाली आहे. शनिवारी मुसळधार पाऊस पडला. यामुळे येरळा नदीला पाणी आले. बळीराजा सुखावला आहे.पाऊस पडतोय, म्हणून घरात बसून राहणं या बळीराजाला परवडणारं नाही. लहरी पावसाने या पूर्वीच खरीप पिके वाया गेली आहेत. त्यातच थोडीफार हाताला लागणारी पिके काढण्याचे कामात शेतकरीवर्ग व्यस्त असताना मुसळधार पावसाने शनिवारी हजेरी लावल्यामुळे या मुसळधार पावसातही बळीराजाने आपली जिद्द न सोडता आपल्या सर्जा-राजाच्या जोडीला गाडीला जुंपून शेतात काढलेले पीक सुरक्षितपणे आणण्याची गडबडीत शेतकरीवर्ग दिसून येत होता. प्लास्टिक कागदाचे अच्छादन देऊन काढलेले पीक सुरक्षित ठेवण्याची देखील गडबड करताना शेतकरी दिसून येत आहे. हा पाऊस आणखी काही दिवस असाच राहिला तर बळीराजासह जिल्ह्यावर आलेले दुष्काळाचे सावट सहज दूर होणार आहे. त्यामुळेच भर पावसात शेतीची कामे करण्यात बळीराजा मग्न आहे. त्याच्या साथ देण्यासाठी सर्जा-राजाही आहेच. (वार्ताहर)धरणी आईची माया, कशी जाईल वायामुसळधार पावसामुळे खटावमधील भर बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत होता. प्रत्येक वाहनस्वार गाड्या रस्त्याच्या कडेला उभ्या करून पावसापासून बचाव करण्यासाठी आसरा शोधत होता. मिळेल त्या दुकानात जाऊन थांबत होता. पण, याच वेळी रिपरिप पावसाच्या आवाजात खडखडाटाचा सूर मिसळत एक बैलगाडी धावत सुटली होती. पावसात भिजण्याने आजारी पडण्याची भीती नव्हती की लवकर घर जाण्याची त्यांची धडपड नव्हती. ते निघाले होते काळ्या आईची सेवा करण्यासाठी शेताकडे. पावसात भिजण्याचा आनंद बळीराजाप्रमाणेच त्याच्या सर्जा-राजाही झाला होता. कारण बळीराजाच्या ओठावर कवी विठ्ठल वाघ यांच्या कवितेतील ‘लय दिवसानं, लय नवसानं लागलंय आभाळ गाया... धरणी आईची माया, कशी जाईल वाया,’ या ओळी सहज आल्या होत्या.