शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
5
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
6
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
11
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
12
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
13
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
14
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
15
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
16
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
17
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
18
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
19
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
20
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर

डीजेच्या तालावर सखींचा ‘रेन डान्स’

By admin | Updated: March 31, 2015 00:20 IST

रंगांची उधळण : ‘रंगात रंगूया... चला रंग खेळूया’ला प्रतिसाद

सातारा : ‘लोकमत सखी मंच’च्या वतीने आयोजित ‘रंगात रंगूया... चला रंग खेळूया’ या कार्यक्रमाला सखी मंच सदस्या आणि महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. डीजेच्या तालावर सखींनी ‘रेन डान्स’ केला. सुमारे तीन तास रंगांची उधळण सुरू होती. येथील हत्तीखाना शाळेच्या प्रांगणात ‘लोकमत सखी मंच’च्या वतीने महिला आणि युवतींसाठी ‘रंगात रंगूया... चला रंग खेळूया’ या ‘रंगारंग’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिजाऊ प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सिद्धी पवार, आशा साळुंखे, अश्विनी शिखरे, संगीता शर्मा, शमा बागवान, मनीषा भोसले, सुनीता कीर्दत, जुई साळुंखे, आर्या आवारे यांच्या उपस्थितीत झाले. दहावी-बारावी आणि स्कॉलरशीप परीक्षांमधून मोकळा श्वास घेतलेल्या सर्व युवती व महिलांसाठी ‘लोकमत संखी मंच’ने खास हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात नैसर्गिक रंग वापरण्यात आले. सखींना ‘लोकमत’च्या वतीनेही रंग देण्यात आले होते. स्प्रिंकलर सिस्टीमद्वारे पाण्याचा वर्षाव केला जात होता. हिंदी-मराठी, रिमिक्स गाणी व डीजेच्या तालावर सखींनी ‘रेन डान्स’ केला. लहान मुली व वृद्धाही सहभागी झाल्या होत्या. आर्या आवारे हिने सादर केलेल्या ‘दिल है छोटासा’, ‘एक-दो-तीन’ या नृत्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. (प्रतिनिधी)कार्यक्रमाच्या मध्यंतरी कास हॉलिडेज रिसॉर्टतर्फे एका सखीला एक दिवसीय पॅकेज, इम्प्रेशन ब्युटीपार्लरतर्फे पाच सखींना फेशियल, आनंद कृषी पर्यटनतर्फे तीन सखींना शिवार सहल, सुर्वेज हॉटेलतर्फे दहा सखींना जेवण आणि एस. एस. एंटरप्रायजेस तर्फे दोन सखींना इलेक्ट्रिॉनिक इस्त्रीचा लकी ड्रॉ काढण्यात आला. जिजाऊ प्रतिष्ठानच्या सिद्धी पवार आणि कास हॉलिडे रिसॉर्टच्या सारिका जाधव यांच्या हस्ते हा ड्रॉ काढण्यात आला.