शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 23:05 IST

सातारा : साताºयासह जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर कडक ऊन पडले होते.तसेच वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत होता. सायंकाळी साडेचारच्या सुमारास मेघगर्जनेसह मुसळधारपाऊस झाला. अचानक झालेल्या पावसामुळे सातारकरांची चांगलीच पळापळ झाली.जिल्ह्यातील बहुतांश भागास गेल्यावादळी वाºयासह मुसळधार पावसाने झोडपून काढले. वाºयामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली तर रस्त्याकडेची झाडे, फांद्या पडल्याने अनेक मार्गावरील वाहतूक विस्कळीत ...

सातारा : साताºयासह जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर कडक ऊन पडले होते.तसेच वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत होता. सायंकाळी साडेचारच्या सुमारास मेघगर्जनेसह मुसळधारपाऊस झाला. अचानक झालेल्या पावसामुळे सातारकरांची चांगलीच पळापळ झाली.जिल्ह्यातील बहुतांश भागास गेल्यावादळी वाºयासह मुसळधार पावसाने झोडपून काढले. वाºयामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली तर रस्त्याकडेची झाडे, फांद्या पडल्याने अनेक मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.दरम्यान, शुक्रवारी सकाळपासूनच कडक ऊन पडले होते. वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत असल्याने अंगाची लाहीलाही होत होती. सायंकाळी साडेचारच्या सुमारास अचानक काळे ढग जमा झाले. त्यानंतर मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. शाळा काही दिवसांत सुरू होणार असल्याने बाजारपेठेत शालेय साहित्य विक्रीसाठी आले आहेत. पावसामुळे त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ते झाकून ठेवण्यासाठी विक्रेत्यांची धावपळ उडाली.विजेचा लपंडावशहरातील सर्वच भागात रात्री उशिरापर्यंत विजेचा लपंडाव सुरू होता. सातत्याने विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांची गैरसोय झाली.वादळी वाºयामुळे भिंत पडून तिघे जखमीवादळी वाºयासह पावसामुळे अंबवडे संमत वाघोली, ता. कोरेगाव येथील नवीन बांधकामाची भिंत शेजारील घरावर पडली. त्यामध्ये तिघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रत्नाबाई धनाजी संकुडे (वय ३५), प्रथमेश धनाजी संकुडे (१६) व सविता काशिनाथ संकुडे (६० तिघे रा. अंबवडे संमत वाघोली) अशी जखमींची नावे आहेत.