शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

रायगड पोलिसांची साताऱ्यात मारहाण!

By admin | Updated: December 20, 2015 00:39 IST

दोघे जखमी : पोलीस ठाण्यासमोर संतप्त जमाव; अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंद करण्याची मागणी

सातारा : साताऱ्यातील दोघांना चोरीच्या संशयावरून जबर मारहाण करणाऱ्या रायगडच्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंद करावा, अशी मागणी करीत सातारा शहर पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने नातेवाईक व ‘रिपाइं’चे कार्यकर्ते जमा झाले. पोलिसांनी दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव निघून गेला. दरम्यान, मारहाणीत जखमी झालेल्या दोघांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी विनोद घाडगे याच्या वडिलांचा जबाब पोलिसांनी घेतला आहे. याबाबत घटनास्थळावरून व ‘रिपाइं’ पदाधिकारी, नातेवाइकांनी दिलेली माहिती अशी की, सुमारे १५ दिवसांपूर्वी सैदापूर (सातारा) येथील विनोद जगन्नाथ घाडगे आणि साताऱ्यातील गुरुवार परज येथील बशीर शेख या दोघांना रायगड जिल्'ातील माणगाव पोलिसांनी एका चोरीच्या संशयावरून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यावेळी एका पोलीस उपनिरीक्षकाने मारहाण करून दोघांना परत साताऱ्यात आणून सोडले. त्यानंतर दि. ७ डिसेंबरला हेच पोलीस उपनिरीक्षक साताऱ्यात आले. त्यांनी विनोदला फोन करून बोलावून घेऊन एका लॉजमध्ये मारहाण केली. ‘तुझ्याबरोबर चोरीत कोण-कोण आहेत?,’ अशी विचारणा केली. तसेच ‘तुझा एन्काउंटर करू, मोक्का लावू,’ अशी धमकीही दिली. त्यावेळी विनोदला मारहाणीमुळे त्रास झाल्याने त्याला साताऱ्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, शुक्रवार, दि. १८ रोजी पुन्हा रायगड पोलिसांनी विनोद आणि बशीरला साताऱ्यातून ताब्यात घेतले. एका वाहनातून त्यांना कऱ्हाडच्या दिशेने नेण्यात आले. संपूर्ण वाटेत पोलिसांनी दोघांनाही मारहाण केली. त्यानंतर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोघांनाही येथील गुरुवार परजावर सोडून देण्यात आले. दोघेही बेशुद्धावस्थेत होते. कोणीतरी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर सातारा पोलिसांनी दोघांनाही जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. शनिवारी सकाळी नातेवाइकांना मारहाणीचा हा प्रकार समजल्यानंतर ‘रिपाइं’च्या पदाधिकाऱ्यांसह सर्वजण जिल्हा रुग्णालयातून सातारा शहर पोलीस ठाण्यात आले. त्यावेळी पोलीस उपअधीक्षक खंडेराव धरणे, पोलीस निरीक्षक राजीव मुठाणे यांनी जमावाचे बोलणे ऐकून घेतले. ‘तुमचा जबाब घेऊ, चौकशी करून संबंधितांवर कारवाई करू,’ असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. पण जमाव ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. ‘डोंगरे नामक अधिकाऱ्यावर गुन्हा नोंद करा,’ अशी मागणी करत त्यांनी पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या मांडला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर, पोलीस उपअधीक्षक धरणे यांना जमावासमोर येऊन ‘संबंधितांवर कारवाई करू,’ असे आश्वासन द्यावे लागले. त्यानंतर जमाव निघून गेला. यावेळी ‘रिपाइं’चे किशोर तपासे, शरद गायकवाड, अप्पा तुपे, अण्णा वायदंडे, भूपाल घाडगे, किशोर गालफाडे, वैभव गायकवाड, शिवराज म्हस्के आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) दोघांचाही जबाब नाही... नातेवाइकांनी जखमींचा जबाब घेण्याची मागणी केली होती; पण रात्री उशिरापर्यंत जखमींचा जबाब घेण्यात आलेला नव्हता. जखमी दोघांवरही जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.