शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वाळूसाठ्यांवर छापा; पावणेदोन कोटींचा ऐवज जप्त!

By admin | Updated: December 31, 2015 23:58 IST

तहसीलदारांची कारवाई : वेणेगावात सुरू होता अवैध उपसा; दोघांविरुद्ध गुन्हा

सातारा : अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्या ठिय्यांवर वेणेगाव (ता. सातारा) येथे तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या पथकाने बुधवारी रात्री छापा घातला. या छाप्यात तब्बल १ कोटी ७६ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असून, दोघांविरुद्ध बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.युवराज कमलाकर फडतरे आणि सुंदर कल्याण घाडगे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. जिल्हाधिकारी अश्विन मुद््गल आणि प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. युवराज फडतरे यांना वेणेगाव येथील कृष्णा नदीमध्ये वाळू भूखंड क्र. १ मंजूर झाला होता; परंतु यांत्रिक बोट वापरण्याची परवानगी न घेता अनधिकृतपणे दोन बोटी वापरून वाळूचे उत्खनन केल्यामुळे त्यांच्यावर अपशिंगे येथील मंडलाधिकाऱ्यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अवैध उत्खननासाठी वापरलेली यंत्रसामग्री, दोन सक्शन पंप, दोन ट्रक, एक ट्रॅक्टर जप्त करण्यात आला. २०१५-१६ मध्ये सावली अ‍ॅग्रो इंजिनिअरिंगतर्फे सुंदर कल्याण घाडगे (रा. कामेरी) यांना वेणेगाव येथील भूखंड क्र. २ येथे कृष्णा नदीतील वाळू उत्खननासाठी लिलाव मंजूर झाला होता. त्यांनी तेथे अनधिकृतपणे पाच बोटी लावून वाळू उत्खनन केले. लिलाव परवानामंजुरीच्या आदेशातील अटी व शर्तींचे उल्लंघन करून विनापरवाना बोटी लावून उत्खनन केल्याच्या कारणावरून घाडगे यांच्यावर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तहसीलदार राजेश चव्हाण व नायब तहसीलदार अमर रसाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली. (प्रतिनिधी)