शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

तुकोबारायांच्या सेवेत रहिमतपूरची बैलजोडी!

By admin | Updated: July 11, 2016 00:57 IST

पालखी ओढण्याचा मान : हणमंतराव जाधव यांच्या बिर्ज्या-सोन्याकडून संतसेवा

 रहिमतपूर : विठुरायांच्या दर्शनाची आस मनात बाळगून राज्यभरातून संतांच्या पालख्या पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. आयुष्यात एकदा तरी वारी घडावी म्हणून असंख्य माणसं धडपडत असतात. ज्यांना वारी शक्य नाही, असे लोक संतांची सेवा करतात. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी ओढण्याचा मान चक्क रहिमतपूरमधील बिर्ज्या-सोन्या या बैलजोडीला मिळाला आहे. रहिमतपूरमधील विठ्ठलाचे वारकरी शेतकरी हणमंत बाजीराव जाधव हे विठ्ठलाचे भक्त आहेत. आपल्या बैलांकडून संतसेवा घडावी, असे त्यांना अनेकवेळा वाटत होते. त्यानुसार त्यांनी माहिती घेऊन बैलजोडीचे छायाचित्रे देहू येथील तुकाराम महाराज देवस्थान ट्रस्टला इंटरनेटद्वारे पाठविले. या फोटोवरून देवस्थानच्या विश्वस्तांनी रहितमपूरला येऊन बैलांची पाहणी केली. हणमंत जाधव यांच्या बिर्ज्या आणि सोन्याला पुणे जिल्ह्यातील उरळी कांचनपासून यवत मुक्कामापर्यंत पालखी ओढण्याचा मान दिला. जाधव यांच्या बिर्ज्या, सोन्याच्या रूपाने रहिमतपूरमधील पहिल्याच बैलजोडींना संतसेवेचा मान मिळाला आहे. यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे. हे बैलजोड आता गावी आली असून, महिलांनी त्यांचे पूजन केले आहे. (वार्ताहर)