शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रहिमतपूरमध्ये फौजदाराला जिवे मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 22:46 IST

रहिमतपूर : हॉटेलमालकावर कारवाई करण्यास नकार दिल्याच्या रागातून दोघांनी भरधाव दुचाकी पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगावर घातल्याची धक्कादायक घटना घडली. रहिमतपूर ...

रहिमतपूर : हॉटेलमालकावर कारवाई करण्यास नकार दिल्याच्या रागातून दोघांनी भरधाव दुचाकी पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगावर घातल्याची धक्कादायक घटना घडली. रहिमतपूर येथे शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास झालेल्या घटनेत पोलीस उपनिरीक्षक जखमी झाले.याप्रकरणी रहिमतपूर पोलिसांनी रणजित अप्पासाहेब क्षीरसागर (वय २९), नितीन किसन भोसले (३९, दोघे रा. धामणेर, ता. कोरेगाव) यांना अटक केली. रहिमतपूरचे पोलीस उपनिरीक्षक गणेश बाळनाथ जगदाळे (२९, मूळ रा. हिसरे, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रहिमतपूर पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हजेरी संपल्यानंतर जगदाळे घरी जाण्याच्या तयारीत होते. त्यावेळी दोघे पोलीस ठाण्यात आले. त्या दोघांनी ‘तुम्ही कोण आहात? तुमचा ड्रेस कुठे आहे, तुमचा बक्कल नंबर काय?’ असे विचारत, ‘आम्हाला हॉटेलमालकाने खोटे बिल दिले आहे. तुम्ही आता लगेच आमच्याबरोबर चला. नाही तर तुम्हाला खांद्यावरून घेऊन जातो,’ असे सांगितले.त्या दोघांना जगदाळे यांनी ‘आधी तक्रार द्या, त्यानंतर कारवाई केली जाईल,’ असे सांगितले. त्यानंतर ठाण्यातील इतर कर्मचाऱ्यांनी दोघांना समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. दरम्यान, चांदणी चौकात लोकांची गर्दी झाली असल्याची माहिती मिळताच जगदाळे दुचाकी (एमएच ४५ जे ३०४५)वरून ठाण्याच्या पाठीमागील असलेल्या गेटमधून बाहेर पडले.जगदाळे दुचाकीवरून चांदणी चौकाकडे जात असताना रणजित क्षीरसागर व नितीन भोसले हे पाठीमागून भरधाव वेगात दुचाकी (एमएच ११ बीएन ३६) वरून आले. त्यांनी जगदाळे यांना जिवे मारण्याचा उद्देशाने दुचाकीने जोरात ठोकर दिली. यात जगदाळे गंभीर जखमी होऊन त्यांच्या दुचाकीचे नुकसान झाले. त्यानंतर त्या दोघांनी जगदाळे यांना शिवीगाळ करून दमदाटी केली.याप्रकरणी रात्री उशिरा रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी सकाळी दोघांना अटक करून कोरेगाव न्यायालयात हजर केले. दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ करीत आहेत.