शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:03 IST

कुडाळ : गेल्या दोन दिवसांपासून कुडाळसह परिसरातील वातावरणात बदल झाला आहे. गारठा आणि ढगाळ वातावरणामुळे रब्बीच्या पिकांवर परिणाम होऊ ...

कुडाळ : गेल्या दोन दिवसांपासून कुडाळसह परिसरातील वातावरणात बदल झाला आहे. गारठा आणि ढगाळ वातावरणामुळे रब्बीच्या पिकांवर परिणाम होऊ लागला आहे. ज्वारी, गहू, हरभरा ही पिके चांगली आली असून बदललेल्या वातावरणामुळे ज्वारीच्या पानांवर चिकटा, मावा कीड पडल्याचे दिसत आहे. गहू पिकावर तांबेरा तर हरभऱ्यावर घाटेअळी पडण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

शेतकरी चिंताग्रस्त

सातारा : बाजारपेठेत टोमॅटो, कोथिंबीर, भेंडी, मेथी यांसह अनेक पालेभाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात घसरल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. बाजारपेठेत टोमॅटो १० रुपये प्रति किलो या दराने विकला जात आहे, तर कोथिंबीरीच्या दोन पेंड्या दहा रुपयांना मिळत आहेत. दर उतरल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांना मात्र याचा फटका बसला आहे.

जनावरांचा अडथळा

सातारा : शहरातील महात्मा फुले भाजी मंडई व तहसील कार्यालय परिसरात सध्या मोकाट जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मंडई परिसरात कचरा कुंडी नसल्याने शेतकऱ्यांकडून विक्रीयोग्य नसलेला भाजीपाला रस्त्यावरच टाकला जातो. हा भाजीपाल खाण्यासाठी भटकी जनावरे याठिकाणी येत असतात. या जनावरांची वाहतुकीला देखील अडचण निर्माण होत आहे.

खड्ड्यांचे साम्राज्य

सातारा : मोळाचा ओढा ते वर्ये या मार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून, रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अनेकदा छोटे-मोठे अपघात होऊ लागले आहेत. बांधकाम विभागाने येथील खड्डे मुरूम अथवा खडी टाकून तात्पुरत्या स्वरूपात मुजविले होते. मात्र, काही दिवसांतच परिस्थिती जैसे थे झाली आहे.