शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंपाक न येणाऱ्या पत्नीला नदीत ढकलले

By admin | Updated: June 3, 2015 23:39 IST

कऱ्हाडातील घटना : विवाहिता बचावली; पतीसह सासू सासऱ्यावर गुन्हा

कऱ्हाड : स्वयंपाक येत नसल्याच्या कारणावरून पतीने पत्नीला नदीत ढकलून दिल्याची घटना कऱ्हाड शहरातील नवीन कोयना पुलावर घडली. मच्छिमारांनी प्रसंगावधान राखून संबंधित विवाहीतेस वेळीच पाण्याबाहेर काढले. त्यामुळे ती बचावली. पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पतीसह सासु व सासऱ्यावर कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती अझरूद्दीन शरीफ सय्यद, सासु मिनाज शरीफ सय्यद, सासरा शरीफ मुसा सय्यद (तिघेही रा. गोटे, ता. कऱ्हाड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोटे येथील अझरूद्दीन सय्यद याच्याशी सना (वय २०) हिचा विवाह झाला आहे. विवाहानंतर काही दिवसातच सना व अझरूद्दीन यांच्यात किरकोळ कारणावरून वाद होऊ लागले. स्वयंपाक येत नसल्याच्या कारणावरून पती अझरूद्दीन याच्यासह सासू व सासऱ्याकडून सनाला मारहाणही केली जात होती. मंगळवारी, दि. २ सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सना घरकाम करीत असताना अझरूद्दीन घरामध्ये आला. त्याने तिला जबरदस्तीने ओढत घराबाहेर आणले. आपल्या दुचाकीवर बसवून तो तीला घेऊन नवीन कोयना पुलावर गेला. पुलाच्या मध्यभागी आल्यानंतर अझरूद्दीनने दुचाकी थांबविली. त्यानंतर अझरूद्दीन व सना दोघेही पुलाच्या पदपथावर जावून थांबले. त्यावेळी अझरूद्दीन वारंवार सनाला शिवीगाळ करत होता. तसेच रागाच्या भरात त्याने तीला जीवंत सोडत नाही, असे म्हणत उचलून नदिपात्रामध्ये फेकले. सना नदिमध्ये गटांगळ्या खात असताना अझरूद्दीन दुचाकी घेवून तेथून निघून गेला. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह नदित मासेमारी करणाऱ्यांनी हा प्रकार पाहिला. यानंतर संबंधित मच्छिमारांनी पाण्यात उड्या घेवून महिलेला बाहेर काढले. (प्रतिनिधी) मच्छिमारांनी वाचविले प्राणमच्छिमारांनी तातडीने नदिपात्रात उड्या घेवून गटांगळ्या खाणाऱ्या सनाला पाण्यातून बाहेर काढले. काही वेळानंतर सनाचे सासू सासरेही त्याठिकाणी आले त्यांनी तिला घरी नेऊन घटनेबाबत पोलिसांना माहिती देवू नको, असे धमकावले. मात्र सना हिने धाडस करून याबाबत कऱ्हाड शहर पोलिसांत फिर्याद दिली असून त्यानुसार पती अझरूद्दीन याच्यासह सासू सासऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरिक्षक राजेंद्र राजमाने तपास करीत आहेत.