शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

वाढला टक्का..कुणाला धक्का?

By admin | Updated: October 16, 2014 00:10 IST

कापीलमध्ये मारामारी : अपवाद वगळता सर्वत्र शांततेत मतदान

कऱ्हाड : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सरासरी ७२.६४ टक्के मतदान झाले. टक्का वाढल्यने कुणाला धक्का बसणार, याची चर्चा आता सुरू झाली आहे. मतदान केंद्रांवर सकाळपासून मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी उन्हाच्या तडाख्यामुळे काही केंद्रांवर शुकशुकाट जाणवला. मात्र, सायंकाळी पुन्हा उत्स्फूर्तपणे मतदान झाले. कापील येथे दोन गटांतील कार्यकर्त्यांमध्ये झालेली मारामारी वगळता मतदारसंघात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. संवेदनशील असणाऱ्या काले गावात ७५ टक्के, विंगमध्ये ७९ टक्के, वडगाव हवेलीत ८२, मलकापुरात सुमारे ७८ टक्के, तर कऱ्हाड शहरात ७० टक्के मतदान झाले. दक्षिणेतील अनेक गावे संवेदनशील असल्याने कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पृथ्वीराज चव्हाणांची भेटमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे कऱ्हाड दक्षिणमधून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत़ त्यांनी मतदान प्रक्रियेवर स्वत: लक्ष केंद्रित केले होते़ सकाळी कऱ्हाड येथील शाळा क्ऱ ३ मध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला़ त्यानंतर शहरातील सर्व मतदान केंद्रांसह मलकापूर, आगाशिवनगर, चचेगाव, कोयनावसाहत, जखिणवाडी, नांदलापूर, वारुंजी, वहागाव, धोंडेवाडी, काले, कालेटेक, वाठार यासह मतदारसंघातील मतदान केंद्रांवर जाऊन मतदानाबाबत केंद्रप्रमुखांशी चर्चा केली़ यावेळी आमदार आनंदराव पाटील यांच्यासह कार्यकर्ते त्यांच्यासोबत होते. पोलिंग एजंटांमध्ये बाचाबाचीमलकापूरात बुथ क्रमांक १६३ मध्ये मतदान सुरू झाल्यानंतर सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एका पक्षाच्या पोलींग एजंटने एका मतदारावर अक्षेप घेतला़ यावेळी विरोधी पक्षाच्या पोलींग एजंटाची संबंधित एजंटाशी बाचाबाची झाली़ केंद्रप्रमुखाने हस्तक्षेप करून त्या मतदाराचे ओळखपत्र व मतदार यादितील नाव ग्राह्य मानून संबंधीत मतदारास मतदानाचा हक्क बजावण्याची परवानगी दिली़ दोन आमदार आमने-सामनेकाले येथे दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास उमेदवार आमदार विलासराव पाटील-उंडाळकर मतदान केंद्रावर आले. त्यापाठोपाठ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारात आघाडीवर असणारे आमदार आनंदराव पाटील त्याठिकाणी आले. त्यामुळे दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये चुळबुळ सुरू झाली. उंडाळकर लगेच निघून गेले; पण आनंदराव पाटील पृथ्वीराज चव्हाणांची वाट पाहत थांबले होते. पाटीलवाडीत पोलिंग एजंटांमध्ये वादपाटीलवाडी, ता. कऱ्हाड येथे मतदान केंद्र क्र. ४६ वर एका पक्षाच्या एजंटाला दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दमबाजी केल्याची घटना घडली. पोलिसांनी हस्तक्षेप करीत हे प्रकरण हाताळले. या प्रकारामुळे संबंधित ठिकाणी काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. म्हासोली व येवती येथे मतदान केंद्रांत निवडणुकीशी काहीही संबंध नसणाऱ्या दोन तरुणांनी विनापरवाना प्रवेश केला. कार्यकर्त्यांना संशय आल्याने त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने त्याठिकाणी जाऊन संबंधित दोन्ही युवकांना ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक रमेश गर्जे यांनी संबंधित युवकांना ताब्यात घेतले. लक्ष्मीनगरमध्ये दहा मिनिटे प्रक्रिया बंदलक्ष्मीनगर-मलकापूर येथील बुथ क्रमांक १०७ वर सकाळी ११.३० वाजेपर्यंत ३०८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर यंत्राचे एक बटन दाबले जात नसल्याची तक्रार मतदाराने केली़ केंद्रप्रमुखांनी यंत्राची तपसणी करून झोनल आॅफिसर यू. एऩ देसाई यांना माहिती दिली़ त्यानंतर दहाच मिनिटांतच नवीन मशीन देण्यात आले.