शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

गाळात बुडालेल्या बोटीचा कर्मचाऱ्यांना ‘धक्का’!

By admin | Updated: January 30, 2017 23:32 IST

महाबळेश्वर वेण्णा लेक : अधीक्षकासह सहाजणांना कारणे दाखवा

महाबळेश्वर : वेण्णा लेक येथील बोट क्लबमधील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी बोट क्लब अधीक्षकासह सहाजणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, या गैरव्यवहाराची पालिका प्रशासनाने गंभीर दखल घेऊन संबंधित पाच कर्मचाऱ्यांची तत्काळ बोट क्लब विभागातून उचलबांगडी करून त्यांना इतर विभागात पाठविण्यात आले आहे. या प्रकरणाची खातेअंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशीमध्ये दोषी आढळलेल्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी आशा राऊत यांनी दिली.वेण्णा लेक येथे पालिकेच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या बोट क्लबमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार चालतात, अशा तक्रारींमध्ये वाढ झाली होती. या तक्रारींची दखल घेऊन शनिवारी रात्री नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे मुख्याधिकारी आशा राऊत व नगरसेवक कुमार शिंदे यांनी बोट क्लबला अचानक भेट दिली. या भेटीत त्यांना येथे आर्थिक गैरव्यवहार आढळून आला. कोठेही नोंद नसलेली ६,५७० रुपये एवढी रक्कम आढळून आली. तसेच बोटमन यांच्या हजेरी व कामाच्या नोंदीमध्येही मोठी तफावत आढळून आली. अनेक बोटमन केवळ हजेरी लावतात व काम न करताच पगार घेतात तर काही बोटमन गैरहजर दाखवून त्यांच्या नावावर काम करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतरही रविवारी त्याच कर्मचाऱ्यांनी पदभार सांभाळून कामकाज पाहिल्याने प्रशासन या गैरव्यवहारप्रकरणी गंभीर आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. परंतु सोमवारी मुख्याधिकाऱ्यांनी बोट क्लब अधीक्षक वगळता पाच कर्मचाऱ्यांची या विभागातून तत्काळ दुसऱ्या विभागात बदली केल्याने बोट क्लबवर शुकशुकाट पसरला होता. सोमवारी तीन तास बोट क्लब उशिरा सुरू करण्यात आला. सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत पर्यटकांची गैरसोय झाली. अनेक पर्यटकांना नौकाविहाराचा आनंद लुटता आला नाही. (प्रतिनिधी)