शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
2
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
3
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
4
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
5
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
6
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
7
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
8
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
9
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
10
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
11
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
12
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
13
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
14
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
15
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
16
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
17
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
18
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
19
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
20
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी

पुसेगावनगरीत लोटला भक्तीचा सागर

By admin | Updated: July 6, 2015 00:24 IST

महायज्ञ सोहळ्यास प्रारंभ : मिरवणुकीत हत्ती, घोडे, वारकऱ्यांसह विद्यार्थ्यांचा सहभाग

पुसेगाव : विश्वशांती व विश्वकल्याणासाठी येथील सेवागिरी देवस्थान टस्ट्रतर्फे रविवारपासून सात दिवस चालणाऱ्या एकादश कुंडी अतिरूद्र स्वाहकार जप अनुष्ठान महायज्ञाला शोभायात्रेने प्रारंभ झाला. या सोहळ्यानिमित्त पुसेगावनगरीत भक्तीचा सागर लोटला होता. घरोघरी अंगणात सडा टाकून रांगोळी काढण्यात आली होती. तसेच गुढ्या उभारण्यात आल्या होत्या. रविवारी सकाळी ९ वाजता श्री सेवागिरी मंदिरात करवीर पीठाचे श्री शंकराचार्य यांच्या हस्ते सेवागिरी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मठाधिपती सुंदरगिरी महाराज, आ. शशिकांत शिंंदे, आ. प्रभाकर घार्गे, आ. जयकुमार गोरे, विलासराव उंडाळकर, ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव, डॉ. प्र. ल. भुजबळ, शिवाजीराव जाधव, विजय जाधव, अ‍ॅड. विजयराव जाधव उपस्थित होते.सकाळी साडेनऊ वाजता रथ मिरवणुकीस प्रारंभ झाला. बँड पथक, हत्ती, घोडे अग्रभागी असलेल्या या मिरवणुकीत विविध वेशभूषा केलेले विद्यार्थी सहभागी झाले होते. डोक्यावर तुलसीवृंदावन व कलश घेतलेल्या पंचक्रोशीतील महिला, तसेच नागरिक, भाविक हरिनामाचा गजर करत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. यज्ञाचे पौरोहित्य नंदकुमार जोशी करणार आहेत. (वार्ताहर)महिलांच्या ओव्या अन् वारकऱ्यांची फुगडीशिवाजी चौकात विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकार सादर केले. वारकऱ्यांनी ग्यानबा तुकारामांच्या जयघोषात भव्य रिंंगण केले. महिलांच्या भक्तिमय ओव्यांच्या सुरावटीत वारकरी फुगड्या खेळले. या महायज्ञ सोहळ्यासाठी सर्व ग्रामदेवतांना निमंत्रित करून रथ पुन्हा गावाला वळसा घालून साडेबाराच्या दरम्यान मंदिरात पोहचला. त्यानंतर महायज्ञ सोहळ्यास प्रारंभ झाला.