लोणंद : लोणंदमध्ये विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी पोलिसांच्या सहकार्याने नगरपंचायत कर्मचारी आठ दिवस नागरिकांवर कारवाई करीत आहे. विनामास्क फिरणाऱ्यांना २०० रुपये दंड आकारण्यात येत आहे.
कोरोना संसर्गाची दुसरी लाट तीव्र असण्याची शक्यता आहे. नागरिक मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, हात धुण्यास विसरू नये, यासाठी जनजागृती करून बेशिस्त नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. त्याची कारवाई लोणंदमध्ये सुरू आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे मास्क वापरणे, हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग पाळण्याबाबत नागरिकांना जागृत करणे आवश्यक आहे. नागरिकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जागृत करणे हा कारवाईमागचा उद्देश अशी माहिती मुख्याधिकारी हेमंत ढोकले यांनी व्यक्त केले.
गेल्या आठवडाभरात लोणंद शहरात विनामास्क फिरणाऱ्या २३० नागरिकांकडून दोनशे रुपयांप्रमाणे ४६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. सोशल डिस्टन्सिंगचा उपयोग न करणाऱ्या अकरा व्यापाऱ्यांकडून प्रत्येकी एक हजार रुपयांप्रमाणे अकरा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. नागरिकांनी कोरोनाचा प्रसार होऊ नये याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
फोटो
०६लोणंद-कोरोना
लोणंदमध्ये विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर पालिकेच्यावतीने कारवाई केली जात आहे. (छाया : संतोष खरात)