शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-मुंबईकरही घेणार हातीपाटी अन् खोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 23:12 IST

सातारा : वॉटर कप स्पर्धेला सुरुवात होऊन तीन आठवडे झाले असून, जिल्ह्यातील १९८ गावांमध्ये तुफान आलंया. तर आता १ ...

सातारा : वॉटर कप स्पर्धेला सुरुवात होऊन तीन आठवडे झाले असून, जिल्ह्यातील १९८ गावांमध्ये तुफान आलंया. तर आता १ मे रोजी जिल्ह्यातील चार गावांत महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी आॅनलाईन नोंदणी केलेले पुणे, मुंबई, साताऱ्यासह इतर शहरातील नागरिक हातात पाटी, खोरे अन् टिकाव घेणार आहेत. यामुळे ही चळवळ आणखी गतिमान होईल.गेल्या चार वर्षांपासून राज्यात अभिनेता आमीर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या वतीने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा सुरू झालीय. पहिल्या वर्षी या स्पर्धेला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. राज्यातील सातारा, बीड आणि अमरावती हे तीनच जिल्हे स्पर्धेत सहभागी होते. यामध्ये सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यातील वेळू गावाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. दुसºया स्पर्धेसाठी राज्यातील १३ जिल्हे उतरले होते. तर ३० तालुक्यांतील सुमारे १२०० हून अधिक गावांनी स्पर्धेत सहभाग घेतलेला. सातारा जिल्ह्याने दुसºया वर्षीही मोठ्या प्रमाणात व सक्रिय असा सहभाग नोंदवला. जिल्ह्यातील ९६ गावे या स्पर्धेत उतरली होती. तर तिसºया स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील टाकेवाडी आणि भांडवली गावाने राज्यात अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविलेला.वॉटर कप स्पर्धेचा चौथा टप्पा दि. ८ एप्रिलपासून सुरू झाला आहे. हे काम ४५ दिवस म्हणजे दि. २२ मेपर्यंत चालणार आहे. यावर्षीही सातारा जिल्ह्यातील माण, खटाव आणि कोरेगाव हे तीन तालुके सहभागी झालेत. माण आणि खटावमधील प्रत्येकी ६७ आणि कोरेगावमधील ६४ अशा मिळून १९८ गावांत जलसंधारणाचे काम सुरू झालंय. या गावांतील ग्रामस्थ दररोज सकाळी शिवारात जाऊन जलसंधारणाची कामे करत आहेत. कोणी टिकाव घेऊन खोदकाम करतंय. तर कोणी खोरे घेऊन पाट्या भरून देत आहे. यामुळे जलसंधारणाचे काम करण्यासाठी सर्वचजण आपापल्या परीने हातभार लावत आहेत. असे असतानाच आता १ मे रोजी जिल्ह्यात चार ठिकाणी महाश्रमदान होत आहे.कोरेगाव तालुक्यातील सोळशी आणि चिलेवाडी तसेच माणमधील शिंदी बुद्रुक व खटावमधील वरुडमध्ये हे महाश्रमदान होत आहे. या महाश्रमदानात पुणे, मुंबई, सातारा तसेच इतर शहरातील नागरिक येणार आहेत. या नागरिकांनी पाणी फाउंडेशनच्या ‘जलमित्र व्हा’ या आॅनलाईन लिंकवर नोंदणी केली होती. संबंधितांनी कोणत्या तालुक्यात जायचे आहे, हे नोंद केले आहे. त्यावरून त्यांना माहिती देण्यातआली.