शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

तपासणी नाक्याच्या कारवाई खात्यावर ‘भोपळा’!

By admin | Updated: April 23, 2016 00:39 IST

चोवीस तासात दोन कर्मचाऱ्यांचे ‘रोटेशन’ : वनविभागाचा विजयनगर येथील चेकनाका ‘असून अडचण, नसून खोळंबा’; सात वर्षांत एकही कारवाई नाही

कऱ्हाड : कोकणातून केली जाणारी अवैध लाकूड वाहतूक रोखण्यासाठी गुहागर-पंढरपूर राज्यमार्गालगत विजयनगर येथे वनविभागाचा ‘चेकनाका’ आहे; पण सध्या हा नाका असून अडचण, नसून खोळंबा या स्थितीत असल्याचे दिसते. नाक्यावर ‘रोटेशन’ पद्धतीने दोन कर्मचारी ‘ड्यूटी’ बजावत असल्याचे सांगितले जाते़ मात्र, प्रत्यक्षात दिवसातील बहुतांशवेळा बराचवेळ चेकनाक्याचे कार्यालय बंद स्थितीत असते.रत्नागिरी, चिपळूणसह कोकणातील अन्य ठिकाणांहून लाकडाची मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते़ लाकडांनी भरलेल्या ट्रक व कंटेनरची गुहागर-पंढरपूर राज्यमार्गावर वर्दळ असते़ अवैधरीत्या होणारी ही वाहतूक रोखण्यासाठी वनविभागाने जानेवारी २००९ मध्ये राज्यमार्गालगत कऱ्हाड तालुक्यातील विजयनगर येथे तपासणी नाका उभारला़ त्याठिकाणी काही कर्मचाऱ्यांची नेमणूकही करण्यात आली़ मात्र, गेल्या तीन वर्षांत या तपासणी नाक्यावरील कर्मचाऱ्यांना अवैध लाकडाची एकही कारवाई करता आलेली नाही़ जानेवारी २००९ ते आजअखेर या कार्यालयाच्या ‘खात्या’वर एकाही कारवाईची नोंद नाही़ तपासणी नाक्यावरील कर्मचाऱ्यांना रोटेशन पद्धतीने ‘ड्यूटी’ असते़ या ड्यूटीच्या कालावधीत संबंधित कर्मचाऱ्याने राज्यमार्गावरून होणारी अवैध लाकूड वाहतूक रोखणे व लाकूड घेऊन जाणाऱ्या वाहनांकडील परवान्याची तपासणी करणे त्यावर तपासणीचा सही, शिक्का मारणे गरजेचे असते़ मात्र, बहुतांशवेळा कार्यालयच बंद असल्याने लाकूड वाहतूक करणारी वाहने बिनदिक्कतपणे मार्गस्थ होताना दिसतात़ संबंधित कर्मचाऱ्यांपैकी एकही कर्मचारी कधी रस्त्यावर उभे राहून लाकूड वाहतुकीच्या वाहनांची तपासणी करताना दिसत नाही़ कर्मचारी उपस्थित असला तरी तो कार्यालयामध्येच ठाण मांडून असतो़ त्यामुळे कारवाईच्या नावाने अक्षरश: ओरडच आहे. (प्रतिनिधी)विजयनगर टोलनाक्यावर वाहनांची तपासणी केली जाते. संबंधित नाक्यावर एक महिला व एक पुरूष कर्मचारी रोटेशनने ड्यूटीवर असतात. नाक्यानजीकच त्यांच्या क्वार्टर असून काही वेळासाठी कार्यालय बंद करून ते क्वार्टरला जात असतात. हा नाका कधीही बंद नसतो. आम्ही त्या नाक्याची तपासणी करतो. - बाबा शिंदे, वनक्षेत्रपाल, कऱ्हाडकऱ्हाड-पाटण मार्गावरील पळवाटापाटण ते कऱ्हाड मार्गाला अनेक रस्ते जोडले गेले आहेत़ निसरे टोलनाक्यापासून वाहनधारकाला ऊरूल मार्गे उंब्रजकडे जाता येते़ म्होप्रेनजीक असलेल्या फाट्यावरून गेल्यानंतर चाफळ फाट्यावर व तेथून पुढे उंब्रजला जाता येते़ तसेच तांबवे फाट्यावरून किरपे, येणके मार्गे कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गावर कोळे येथे जाता येते़ अवैध लाकूड वाहतूक करणारी वाहने या मार्गांचा वापर करून महामार्गापर्यंत पोहोचतात, त्यामुळे विजयनगर येथे असलेल्या तपासणी नाक्यापर्यंत वाहने पोहोचतच नाहीत.