शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कडधान्यानं मारलं; शेतकऱ्यांना भातानं तारलं; मल्हारपेठ परिसरातील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 23:23 IST

मल्हारपेठ : सतत पडणारा जादा पाऊस व हवामानातील बदलामुळे खरीप हंगामातील कडधान्य व विविध पिकांवर तांबेरा, करपा, पाने खाणारी अळी आदी रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. धूळवाफेवर पेरणी केलेली भात शेती ही जोमात आहे. कारण भात पिकास भरपूर प्रमाणात पाणी मिळालेले आहे. तर कडधान्यातील मूग, उडीद, घेवडा, धना, कारळा आदी पिके ...

मल्हारपेठ : सतत पडणारा जादा पाऊस व हवामानातील बदलामुळे खरीप हंगामातील कडधान्य व विविध पिकांवर तांबेरा, करपा, पाने खाणारी अळी आदी रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. धूळवाफेवर पेरणी केलेली भात शेती ही जोमात आहे. कारण भात पिकास भरपूर प्रमाणात पाणी मिळालेले आहे. तर कडधान्यातील मूग, उडीद, घेवडा, धना, कारळा आदी पिके अतिपावसाने वाया गेली आहेत. पावसाने पिके कुचंबली असून, गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने उघडझाप सुरू केल्यामुळे थोडे फार उत्पन्न मिळेल, असा प्रकारच्या आशा शेतकºयांमध्ये निर्माण झाल्या आहेत.शेतात घातलेला खर्च तरी निघेल, या आशेने शेतकरी वर्गातून रोगांचा प्रादुर्भाव झालेल्या पिकांवर औषध फवारणीसह विविध उपाय केले जात आहेत. कोणत्याही परिस्थितीत शेतीतून उत्पन्न मिळविण्याची धडपड शेतकºयांतून होत असल्याचे चित्र सध्या पाटण तालुक्यातील ग्रामीण भागात दिसत आहे.चालूवर्षी पाटण तालुक्यात वेळेवर जून महिन्यात पावसाने सुरुवात केली. कशाबशा शेतकºयांनी पेरण्या केल्या. सुरुवातीस झालेल्या तुरळक पावसामुळे पिकांची उगवण चांगली झाली. मात्र त्यानंतर मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. अक्षरश: शेतकºयांना शेती मशागतीचीही कामे करता आली नाही. सततच्या पावसामुळे शिवारात पिकांभोवती तणाची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी पडलेल्या पावसामुळे सोयाबीन पिकावर याचा परिणाम झाला आहे. तर भुईमुगाच्या आरा टोचणीची अवस्था असून, सरीवर असणाºया भुईमुगास मोठा मार बसला आहे.चालूवर्षी जादा पावसामुळे भाताची वाढ मोठ्या प्रमाणात झाली असून, सर्वात जास्त उत्पन्न भात करणाºया भात उत्पादक शेतकºयांना मिळेल, अशी अशा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. काही ठिकाणी हवामानातल्या बदलामुळे तांबेरा अशा रोगाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. नदीकाठी पाण्याची सोय असल्याने आडसाली लागणी होतात.चालू वर्षी भात उत्पादक शेतकºयांना फायदासोयाबीन, भुईमूग व कडधान्य करणाºया शेतकºयांची पिके कुचंबली असली तरी जादा पावसाचा फायदा पेरणी व रोप केलेल्या भातांना झाला असल्याने कंबरेच्या वर भात पिके आहेत. चालू वर्षी इतर पिकांच्या तुलनेत पेरणी व रोपभात केलेल्या शेतकºयांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे मत अनेक शेतकºयांनी व्यक्त केले.