शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

चाकोरी सोडलेल्यांना जनताच जागा दाखवते

By admin | Updated: November 25, 2015 00:34 IST

शरद पवार : आष्टा नगरपरिषदेच्या काकासाहेब शिंदे भाजी मार्केट, मच्छी मार्केटचे उद्घाटन

आष्टा : लोकांचा चिरकाल पाठिंबा गृहित धरू नका. चाकोरी सोडून गेल्यानंतर लोक नेत्यांना त्यांची जागा दाखवितात. लोकशाहीत जे सत्ता देतात, तेच सत्ता काढून घेतात. बांग्लादेश युद्धानंतर इंदिरा गांधींच्या कॉँग्रेसला प्रचंड मताधिक्याने विजय मिळाला; मात्र आणीबाणीनंतर त्याच जनतेने त्यांचा पराभव केला, असे प्रतिपादन खा. शरद पवार यांनी केले. आष्टा (ता. वाळवा) येथे आष्टा नगरपरिषदेच्या शतकोत्तर हीरकमहोत्सव सांगता समारंभानिमित्त पहिले थेट लोकनियुक्त नगराध्यक्ष काकासाहेब शिंदे भाजी मार्केट व अद्ययावत मच्छी मार्केटच्या उद्घाटनप्रसंगी शरद पवार बोलत होते. यावेळी माजी मंत्री आ. प्रभाकर घार्गे, आ. जयंतराव पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. प्रभाकर घार्गे, आ. सुमनताई पाटील. आ. मानसिंगभाऊ नाईक, माजी आ. विलासराव शिंदे, नगराध्यक्षा सौ. मंगलादेवी शिंदे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, जि. प. अध्यक्ष रेश्माक्का होर्तीकर, इलियास नायकवडी, अरूण लाड, विजय सगरे, विश्वासराव पाटील, उपनगराध्यक्षा सुनीता वारे आदी उपस्थित होते.पवार म्हणाले, ऊस कारखादारीत केंद्राचे धोरण अडचणीचे ठरत आहे. साखरेचा दर २४१० पर्यंत खाली आला आहे. दिवाळीतही दर खाली घसरले. देशाला कर्तृत्ववान नेतृत्व लाभले तरी, साखर उद्योगाबाबत देशाची नीती ठीक नसल्याने साखरेचे दर घसरले आहेत. त्याची झळ शेतकऱ्यांना बसत आहे.हे चित्र बदलण्यासाठी शासनाने उपाययोजना केल्या पाहिजेत. निर्मितीची नवीन साधने तयार केली पाहिजेत. विलासराव शिंदे यांनी एकहाती सत्ता मिळवून शहरात विकास कामांचा डोंगर उभा केला आहे. राज्य शासन स्थानिक स्वराज्य संस्थांना मदत क रीत नसल्याने त्याचा विकासावर परिणाम होत आहे. त्याचा २ वर्षात परिणाम दिसेल. ५० वर्षांचा विकास करण्याच्या दूरदृष्टीचा अभाव जाणवत आहे. जिल्हा, राज्य, देश बदलण्यासाठी शेतीबरोबरच शिक्षण व अन्य क्षेत्रात कर्तृत्व दाखविणारी पिढी निर्माण केली पाहिजे, असेही ते म्हणाले. आ. जयंतराव पाटील म्हणाले, आष्टा पालिकेने राज्यातील सर्व विकास योजना राबविल्या आहेत. ‘आदर्श शहर’ म्हणून आष्टा नावारूपाला आले आहे. पतंगराव कदम म्हणाले, वसंतरावदादा पाटील, शरद पवार, शंकरराव चव्हाण यांनी वाढविलेल्या सहकारी सस्था वाढतात की मोडतात, अशी स्थिती असताना, सावधपणे काम करण्याची गरज आहे. यासाठी आता शासनाने प्रयत्न करावेत. अण्णासाहेब डांगे म्हणाले, आष्टा पालिकेने १६१ वर्षात उत्कृष्टपणे काम केले आहे. विकास मंदिर त्यांनी उभारले आहे. डांगे शिक्षण संकुल आष्ट्याच्या वैभवात भर घालेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.विलासराव शिंदे म्हणाले की, आष्टा शहर लवकरच राज्यातील पहिले शौचालययुक्त शहर होईल. आष्टा नगरपालिकेला चांगला निधी मिळाला आहे. यावरुन यापुढेही विकास करण्यात येईल. मंगलादेवी शिंदे म्हणाल्या की, खा. शरद पवार यांच्यामुळेच महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के आरक्षण मिळाले आहे. ते विधानसभा, विधानपरिषदेतही मिळावे. मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी आभार मानले. यावेळी नगराध्यक्षा सौ. मंगलादेवी शिंदे, झुंझारराव शिंदे, सौ. रंजना शेळके, सौ. झिनत आत्तार, सुखदेव भंडारे, रमेश जन्नर, अरूण, मोटकट्टे, आक्काताई कोळी, सज्जन मोहिते, अभियंता चंद्रकांत पाटील, बाजीराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला.माजी खा. निवेदिता माने, प्रणव चौगले, मयूर धनवडे, विजय मोरे, के. टी. वग्याणी, बाळासाहेब वाडकर, अनिल बोडे, सुनील बोडे, जमिलाबी लतीफ, प्रकाश रुकडे, अर्जुन माने, माणिक शेळके, नंदकुमार बसुगडे, प्रकाश मिरजकर, शेरनवाब देवळे, इंद्रजित चव्हाण, बी. एस. संकपाळ, प्रभाकर जाधव, उदय कुशिरे, सतीश माळी, झुंझारराव पाटील, वैभव शिंदे, अशोक पाटील, शैलेश सावंत उपस्थित होते. (वार्ताहर)सहकार चळवळ टिकवण्याचे आव्हान पतंगराव कदम म्हणाले, वसंतरावदादा पाटील, शरद पवार, शंकरराव चव्हाण यांनी वाढविलेल्या सहकारी सस्था वाढतात की मोडतात, अशी स्थिती असताना, सावधपणे काम करण्याची गरज आहे. राज्यात सहकारी संस्थांना घरघर लागली आहे. सहकार चळवळीत राजकारण शिरले आहे. याचा परिणाम गंभीर होत आहे. सहकार चळवळ टिकवण्याचे मोठे आव्हान आता सर्वासमोर उभे राहिले आहे. ते पेलण्याची आज गरज आहे. सहकार चळवळ टिकलीतरच ग्रामीण भागाचा विकास शक्य आहे.