शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

कोरोना लस देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळविणे आणि लसीकरण करणे यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळविणे आणि लसीकरण करणे यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. हा ताण टाळण्यासाठी शासनाने लस देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा द्यावी, अशा आशयाचा ठराव आरोग्य समिती सभेत करण्यात आला. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांत सीसीटीव्ही बसविणे व फायर ऑडिचाही निर्णय झाला.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य आणि बांधकाम समितीची मासिक सभा उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. सभेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, सदस्य मनोज पवार, बापूराव जाधव, सागर शिवदास, शारदा ननावरे, अर्चना रांजणे यांच्यासह बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

आरोग्य समितीच्या मासिक सभेत मागील सभेचा कार्यवृत्तांत वाचून कायम करण्यात आला. तसेच शासन परिपत्रकांचे वाचन करण्यात आले. त्यानंतर कोरोना विषयावर चर्चा करण्यात आली.

जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढत चालली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर आरोग्य विभागावर नागरिकांना कोरोना लस देण्याचीही जबाबदारी आहे. या दुहेरी जबाबदारीमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आहे. यासाठी जिल्ह्यातील कोरोना लसीसाठी स्वतंत्र यंत्रणा द्यावी यासाठी शासनाकडे मागणी करण्याचा विचार पुढे आला. त्याप्रमाणे सदस्यांनी ठरावही घेतला. आढाव्यादरम्यान, जिल्ह्यात कोरोना लस कमी पडणार नाही याबाबत दक्षता घेण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात लसीचे ६० हजार डोस उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. कोरोना लसीचा हा साठा तीन दिवस पुरू शकतो.

जिल्ह्यात ७२ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. या केंद्रात सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय झाला. यासाठी १३ लाख रुपये खर्च येणार असून तो जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून करण्याचे निश्चित करण्यात आले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे फायर आॅडिट करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन कोटींचा निधी अपेक्षित आहे. या निधीची तरतूद जिल्हा नियोजन मंडळातून करण्यात येणार आहे.

चौकट :

जिल्हा परिषदेतील रुग्णालय सुरू होणार...

जिल्हा परिषदेत आरोग्य विभागामार्फत रुग्णालय सुरू होते. या ठिकाणी कर्मचारी जाऊन वैद्यकीय सेवा घेत होते. पण, अनेक महिन्यांपासून रुग्णालय बंद आहे. कर्मचाऱ्यांसाठी हे रुग्णालय सुरू करण्याचा निर्णयही झाल्याची माहिती उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी दिली.

.............................................................