शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मावळे असल्याचा सार्थ अभिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:25 IST

महाबळेश्वर : मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी स्थापन झालेल्या शिवसेनेने प्रारंभापासून सर्वसामान्य मराठी माणसांचे नेतृत्व केले आहे. त्यांच्या प्रश्नांना वाचा ...

महाबळेश्वर : मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी स्थापन झालेल्या शिवसेनेने प्रारंभापासून सर्वसामान्य मराठी माणसांचे नेतृत्व केले आहे. त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून ते प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना कायम आक्रमक राहिली आहे. अशा संघटनेचे आम्ही मावळे असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे अशा आपल्या भावना जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे यांनी व्यक्त केल्या.

शिवसेनेचे सातारा जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे व माजी जिल्हा प्रमुख राजेश कुंभारदरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत महाबळेश्वर येथे शिवसेनेचा ५५ वा वर्धापनदिन साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

येथील हनुमान मंदिरात महाबळेश्वर शिवसेना शाखेच्या वतीने शिवसेनेचा ५५ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे व माजी जिल्हा प्रमुख राजेश कुंभारदरे यांच्या पुष्प्हार घालून त्यांना अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमास नगरसेवक संजय पिसाळ, शहर प्रमुख राजेश वागदरे, शहर प्रमुख महेश गुजर, राजेंद्र पंडित, राजेश सोंडकर, बंडू फळणे, प्रशांत मोरे, ताथवडेकर आदी उपस्थित होते.