शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

मोठ्या मूर्तींचे विसर्जन टाळून पर्यावरणाचे रक्षण

By admin | Updated: September 30, 2015 00:02 IST

प्रशासनाकडून कौतुक : सातारा शहरातील १९ मंडळांचा पुढाकार

दत्ता यादव- सातारा  -शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे महाकाय गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करत असतात. मात्र, पर्यावरणाची हानी होत असल्याबाबत ‘लोकमत’ने जनजागृती केल्याने शहरातील तब्बल १९ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा मोठ्या मूर्तीचे विसर्जन न करता छोट्या मूर्तींचे विसर्जन केले. यंदा पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी स्वत:हून पुढाकार घेतल्याने प्रशासनाकडूनही त्यांचे कौतुक होत आहे.हल्ली गणेशोत्सव म्हटलं की भरमसाठ खर्च. जस-जशी महागाई भडकत गेली तस-तसा गणेशोत्सवाचा खर्चही लाखांच्या घरात पोहोचला. मोठ्या गणेशमूर्तीची किंमत २५ हजारांपासून ते सव्वा लाखांपर्यंत असते. त्यामुळे दरवर्षी मंडळातील कार्यकर्ते वर्गणी अथवा स्वच्छेने पैसे काढून मूर्तीची प्रतिष्ठापना करत असतात. त्यामुळे इथून पुढे दरवर्षी एकच मूर्ती कायम ठेवली तर खर्चही वाचेल; शिवाय पर्यावरणाचे रक्षणही होईल, अशी दुहेरी भूमिका घेऊन गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी यंदा इतर मंडळांना आर्दश घालून दिलाय.गेल्या वर्षी शहरातील केवळ सहा मंडळांनी मूर्ती कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, यंदा ‘लोकमत’ने राबविलेल्या चळवळीमुळे या उपक्रमाला चांगली बळकटी आली. त्यामुळे पाहता-पाहता १९ गणेश मंडळांनी मूर्ती विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक गणेशोत्सव मंडळ (पोवई नाका), जयहिंद गणेशोत्सव मंडळ (शनिवार पेठ), एकता गणेश उत्सव मंडळ (गुरवार पेठ), वटसिद्धी गणेश मंडळ (एसटी कॉलनी, सातारा) यासह अन्य मंडळांचा त्यामध्ये समावेश आहे. मोठी मूर्ती ठेवायची कुठे, असा प्रश्न उपस्थित होत असला तरी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी खासगी जागेमध्ये अशा मूर्ती सुरक्षित ठेवल्या आहेत. मोठ्या मूर्ती झाकून त्या सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आल्या आहेत.मोठ्या मूर्तींऐवजी लहान मूर्तीचे विसर्जन करून पर्यावरणाच्या दृष्टीनेही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विचार केलाय. काही मंडळांनी आदल्या दिवशी अचानक निर्णय घेऊन मोठ्या मूर्तीचे विसर्जन करायचे नाही, असा निर्णय घेतला. पोलिसांच्या रेकॉर्डवर शहरातील १९ मंडळांची नोंद असली तरी नोंद नसलेल्या अनेक मंडळांनी या वर्षी मोठ्या मूर्तींचे विसर्जन केले नाही. विसर्जन न करणाऱ्या मंडळांचा आकडा पुढील वर्षी यापेक्षाही वाढेल, अशी अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त होत आहे.