शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील वाघ सह्याद्रीत आणण्याचा प्रस्ताव : खामकर

By admin | Updated: April 23, 2016 00:42 IST

‘वाघ असणाऱ्या १३ देशांची नवी दिल्लीत व्याघ्र संवर्धन परिषद नुकतीच झाली.

कऱ्हाड : विदर्भातील जादा वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा भाग असलेल्या कोयना, चांदोली व राधानगरी परिसरात सोडता येऊ शकतात का, यासाठीचा प्राथमिक अहवाल सादर करण्याच्या सूचना सह्याद्री व्याघ्र प्रकल्प संचालकांना दिल्या आहेत. पुढील महिन्यात याबाबत नागपूर येथे वन विभागाच्या मुख्यालयात प्राथमिक बैठक होण्याची शक्यता आहे,’ अशी माहिती वन्यजीव अभ्यासक नाना खामकर यांनी दिली.सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने नवी दिल्लीतील जागतिक व्याघ्र संवर्धन परिषदेत झालेल्या चर्चेची माहिती खामकर यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. विभागीय वन (वन्यजीव) अधिकारी मिलिंद पंडितराव, एस. एल. झुरे, सहायक वनसंरक्षक सुभाष पुराणिक, व्ही. एस. थोरात, वनक्षेत्रपाल किरण कांबळे, मानद वन्यजीवरक्षक रोहन भाटे, डॉ. शामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेचे तज्ज्ञ शैलेश माहुलीकर वनाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. खामकर म्हणाले, ‘विदर्भातील ताडोबा, पेंच व मेळघाट या व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या वाढली आहे. त्यामुळे मनुष्य व वन्यजीव यांच्यातील संघर्ष वाढीस लागला आहे. यावर उपाय म्हणून वन्यजीवतज्ञांनी ज्या व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या कमी आहे, अशा ठिकाणी अतिरिक्त वाघ सोडण्याची सूचना शासनाला दिली आहे. ‘वाघ असणाऱ्या १३ देशांची नवी दिल्लीत व्याघ्र संवर्धन परिषद नुकतीच झाली. त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व वनमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत झाले. या परिषदेत मी व रोहन भाटे सहभागी झालो होतो. या परिषदेत २०२२ पर्यंत वाघांची संख्या दुप्पटीने वाढविण्याचा संकल्प करण्यात आला. त्या अनुषंगाने ज्या देशांमध्ये वाघ नामशेष होत चालले आहेत अथवा त्यांची शिकार मोठ्या प्रमाणावर होत आहे, अशा देशांमध्ये वाघांचे पुनरुज्जीवन करण्याचे ठरले. त्यासाठी भारत इतर देशांना सहकार्य करणार असल्याचे सांगण्यात आले. व्हिएतनाम, कम्बोडिया व म्यानमार या देशांमध्ये वाघ झपाट्याने कमी होत आहेत. या देशांना भारताने सहकार्य करण्याचे ठरवले आहे.’ (प्रतिनिधी)