शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

प्रचारातही बांधाची रेटारेटी..!

By admin | Updated: June 16, 2015 01:37 IST

तिकीट वाटपात ‘दे धक्का’ : इस्लामपुरात बंधुप्रेमाला सोडचिठ्ठी..

अशोक पाटील-इस्लामपूर =-इस्लामपूर नगरपालिकेचे पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांनी त्यांचे चुलत बंधू संजय पाटील यांना सहकार पॅनेलची उमेदवारी देऊन, त्यांच्या घरातील संजय पाटील यांचे सख्खे बंधू नगरसेवक शहाजी पाटील यांना धक्का दिला आहे. शहाजी पाटील हे संस्थापक पॅनेलचे अविनाश मोहिते यांच्या प्रचारात सक्रिय असून त्यांनी बंधुप्रेमाला सोडचिठ्ठी दिली आहे. या सख्ख्या बंधूंचे कार्यकर्ते मात्र बांध रेटून प्रचारात आघाडीवर आहेत.गत निवडणुकीत मोहिते—भोसले यांच्या मनोमीलनाविरोधात नवखे असलेले अविनाश मोहिते यांनी संस्थापक पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी अविनाश मोहिते यांना इस्लामपुरात उमेदवार मिळणे मुश्कील झाले होते. त्या कठीणप्रसंगी विजयभाऊ पाटील यांचे चुलत बंधू, जय हनुमान पतसंस्थेचे अध्यक्ष शहाजी पाटील यांनी अविनाश मोहिते यांना मोठी मदत केली. त्यांच्याच मध्यस्थीने युवराज पाटील यांना मिळणारे तिकीट माधवराव पाटील यांना देण्यात आले. विशेष म्हणजे ते विजयीही झाले.यावेळी मात्र शहाजी पाटील यांच्याच घरातील संजय पाटील यांनी त्यांचे मित्र जि. प. सदस्य लिंबाजी पाटील यांच्या मदतीने डॉ. सुरेश भोसले यांच्या सहकार पॅनेलमधून उमेदवारी मिळवली आहे. हे दोघेही निवडणुकीच्या रणांगणात आहेत. संजय पाटील यांची भूमिका शहाजी पाटील यांना मान्य नाही. त्यामुळे त्यांनी संजय पाटील यांच्या बंधुप्रेमाला विरोध करीत युवराज पाटील यांच्या प्रचारालाच प्राधान्य दिले आहे. तसेच त्यांचे बंधू, राजारामबापू कारखान्याचे माजी उपाध्यक्ष विश्वासराव पाटील हे संजय पाटील यांचा प्रचार करताना दिसत आहेत. एकूणच प्रचारातही आता बांध रेटारेटीचे राजकारण सुरु आहे.गेला माधव कुणीकडे..!गत निवडणुकीत संस्थापक पॅनेलच्या मेहेरबानीवर निवडून आलेल्या माधवराव पाटील यांनी घरचा अहेर देत अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्याविरोधात जाऊन आवाज उठविला होता. परंतु तो आवाज दबला. यावेळच्या निवडणुकीत त्यांना अर्धचंद्र देण्यात आला आहे. इतर कोणत्याही पॅनेलने त्यांचा विचार केला नाही. त्यामुळे माधवराव पाटील अज्ञातवासात असून त्यांनी आकसापोटी संस्थापक पॅनेलविरोधात निवडणूक जाहीर निवेदन काढले आहे.जयंतराव डिजिटलवर..!आमदार जयंत पाटील यांची भूमिका गुलदस्त्यात आहे. तरीसुध्दा संस्थापक पॅनेलचे उमेदवार युवराज पाटील यांनी त्यांच्या प्रचार सभेच्या डिजिटल पोस्टरवर आमदार जयंत पाटील यांचे छायाचित्र वापरले आहे. याची चर्चा चांगलीच रंगली आहे.