शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

जावळीत मानकुमरे करणार उदयनराजेंचा प्रचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 22:44 IST

सातारा : राजकारणात कोणीही कायमस्वरुपी शत्रू नसतो, हेच पुन्हा एकदा सिद्ध होत असून, राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि जिल्हा ...

सातारा : राजकारणात कोणीही कायमस्वरुपी शत्रू नसतो, हेच पुन्हा एकदा सिद्ध होत असून, राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी खांद्याला खांदा लावून जावळीत प्रचारास सुरुवात केली. भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ या वळणावर, असे म्हणत आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या साक्षीने दोघांनी मैत्रीचे संबंध पुनर्स्थापित केले.सातारा लोकसभा मतदार संघातून खासदार उदयनराजे भोसले हे तिसऱ्यांदा राष्ट्रवादीकडून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेतील उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांच्याशी त्यांची वादावादी झाली होती. तसेच उदयनराजे व त्यांच्यात राजकीय भूमिकेवरून मतभेद निर्माण झाले. हे मतभेद गेल्या दीड वर्षात अगदी टोकापर्यंत गेले होते. एवढेच नव्हे तर पोलीस ठाण्यापर्यंत हा वाद गेला होता.त्यावेळी एकमेकांवर आरोपाच्या फैरी झडत होत्या. या दोन नेत्यांचा संघर्ष टोकाचा झाला होता. त्यामुळे पोलिसांना हे दोन नेते कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येताना प्रचंड खबरदारी घ्यावी लागत होती.मात्र, आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर झाले गेले विसरून हे दोन्ही नेते जावळी तालुक्यातील प्रचार दौऱ्यात सक्रिय झाल्याने नागरिकही आवक झाले आहेत.मेढा, करहर, कुडाळ, हुमगाव, म्हसवे, बामणोली आदी ठिकाणी झालेल्या प्रचार सभा, बैठका व प्रमुख कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेताना ते दिसून आले. तसेच ऐकमेकांशी दिलखुलासपणे चर्चा करीत असताना दिसले. त्यामुळे राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो, हेच सिद्ध होते, अशी चर्चा सातारा, जावळी तालुक्यांमध्ये सुरू आहे.