शहरं
Join us  
Trending Stories
1
Vijay Mallya News : ...तर भारतात परतण्याचा गांभीर्याने विचार करेन; फरार आरोपी विजय मल्ल्याचं मोठं विधान
2
मी नसतो तर डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीत हरले असते; एलन मस्क यांनी पुन्हा साधला निशाणा
3
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी मोठी कारवाई; पोलीस आयुक्तांसह अनेक अधिकारी निलंबित
4
धर्मांतरण ही हिंसाच, घरवापसीचा स्वीकार व्हावा; सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचं विधान
5
'फितना अल हिंदुस्तान' काय आहे? पाकिस्तानला फुटला घाम; भारताविरोधात केला खोटा दावा
6
रोड शोच खटकतो! लोकांचा जीव महत्त्वाचा; विजयाचे सेलिब्रेशन करायचे असेल तर... गंभीर स्पष्टच बोलला
7
राहुल गांधींच्या ‘आत्मसमर्पणा’बाबत केलेल्या वक्तव्यावर शशी थरुर यांची प्रतिक्रिया; म्हणाले...
8
Bangalore Stampede: आरसीबी विरोधात गुन्हा दाखल, चेंगराचेंगरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
9
पाकिस्तानसाठी हेरगिरी! ज्योती मल्होत्रानंतर युट्यूबर जसबीर सिंगला अटक, पोलिसांची मोठी कारवाई
10
आता कोणत्या देशावर रशिया हल्ला करणार?; १० हजार सैन्य तैनातीच्या दाव्यानं युरोपमध्ये खळबळ
11
Nashik Politics: संजय राऊत-सुधाकर बडगुजर यांच्यातील चॅटिंगचा स्क्रीनशॉट व्हायरल
12
Samruddhi Mahamarg: हा फक्त रस्ता नाही, तर राज्याच्या प्रगतीचा इकॉनॉमिक कॉरिडोर -CM देवेंद्र फडणवीस
13
"कारसाठी छळलं, तिसरी मुलगी होईल म्हणून मारलं, आत्महत्या नव्हे, आशाराणीची हत्याच..."
14
IND vs ENG रोहित-विराट यांची उणीव नक्कीच भासेल, पण... इंग्लंड दौऱ्याआधी काय म्हणाला कॅप्टन शुबमन गिल
15
Mumbai Fire: चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये भीषण आग, धुराचे लोट; प्रवाशांची धावपळ
16
Flight Shame: विमान प्रवासाची लाज, काय आहे फ्लाइंग शेम चळवळ प्रकरण?
17
धक्कादायक! मुंबईपासून अवघ्या ६० किमी अंतरावरील गाव बनलं होतं 'इस्लामिक स्टेट लिबरेट झोन'; पुन्हा चर्चेत
18
डॉक्टर दाम्पत्य 12 दिवस डिजिटल अरेस्ट; CBI अधिकारी असल्याचे भासवून 2 कोटी रुपये लुटले
19
स्विफ्ट, वॅगनआर, पंच अथवा क्रेटा नव्हे, तर ही 5-स्टार सेफ्टी असलेली ₹6.84 लाखांची सेडान बनलीय देशातील नंबर-1 कार
20
गडचिरोलीत बदलाची नांदी, ‘कुर्मा घरा’ला अलविदा, महिलांसाठी उभं राहिलं सुरक्षित विश्रांती गृह!

सातारा जिल्ह्यात निषेध, बंद अन् मोर्चा

By admin | Updated: June 9, 2014 01:17 IST

महापुरुषांचे आक्षेपार्ह छायाचित्र : आज ‘सातारा बंद’

सातारा : ‘सोशल मीडिया’वर महापुरुषांच्या प्रतिमेचा अवमान केल्याचे पडसाद आज, रविवारी सातारा जिल्ह्यात उमटले. महाबळेश्वर येथे मोर्चा काढून अवमान करणाऱ्या युवकाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. सातारा शहरातून विविध सामाजिक संघटनांनी निषेध रॅली काढली आणि उद्या, सोमवारी ‘सातारा बंद’ची हाक दिली. दरम्यान, आंबेडकरप्रेमींनी संयम दाखविल्यामुळे जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.महापुरुषांची आक्षेपार्ह आणि अवमानकारक प्रतिमा ‘सोशल मीडिया’वर पोस्ट केल्याची घटना जिल्ह्यात समजताच त्याची पहिली प्रतिक्रिया फलटण शहरात उमटली आणि तिचे पडसाद जिल्हाभरात उमटले. माण, जावळी आणि पाटण येथे काहीवेळ बाजारपेठ बंद होती. सातारा, कऱ्हाड आणि कोरेगाव शहरांत निषेध फेरी काढली. सातारा येथे सर्व आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी आंंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला आणि शहरात निषेध फेरी काढली. ‘रिपाइं’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किशोर तपासे, जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ, कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद गायकवाड, पार्थ पोळके, चंद्रकांत खंडाईत, दयानंद माने, प्रवीण धस्के, संदीप कांबळे, नीलेश भिसे, नवनाथ शिंदे सहभागी झाले होते. दरम्यान, निषेध मोर्चातच ‘सातारा बंद’ची हाक देण्यात आली.कऱ्हाड शहरात कडकडीत बंद पाळला. व्यापारी पेठ तसेच सर्वच दुकाने दिवसभर बंद राहिली. रविवार आठवडी बाजाराचा दिवस असतानाही शुकशुकाट जाणवत होता.कोरेगावात मोर्चा काढून रास्ता रोको करण्यात आला. वाठार स्टेशन येथे रेल्वे रोखली. शिरवळ येथे उद्या, सोमवारी निषेध मोर्चा काढण्यात येणार असून, तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे. दहिवडीत बंद पाळण्यात आला. जावळी येथे उद्या निषेध सभा आयोजित केला असून, यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती ‘रिपाइं’चे तालुकाध्यक्ष संजय गाडे यांनी दिली. (प्रतिनिधी)