शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

‘सर्जा-राजा’संगे ट्रॅक्टरचीही काढली मिरवणूक

By admin | Updated: July 29, 2015 21:52 IST

जिल्ह्यात बेंदूर जल्लोषात : सजविलेल्या बैलांच्या धूमधडाक्यात मिरवणुका; डॉल्बी, बॅन्ड, लेझिम पथकांचा सहभाग

सातारा : शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून शेतीत राबणाऱ्या बैलांना सजवून त्यांची गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्याचा दिवस म्हणजे बेंदूर. बैलांच्या कष्टाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे बेंदूर. यानिमित्त आज (बुधवार) जिल्हाभरात गावोगावी बैलांची जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली. विशेष म्हणजे नागठाणे, ता. सातारा येथे चक्क ट्रॅक्टरचीही मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक अन् आधुनिक काळाचा हा अनोखा मिलाप यंदा पाहायला मिळाला. शेतकऱ्यांच्या दारात आता बैलांऐवजी ट्रॅक्टर उभे असलेले पाहायला मिळतात. शेतकरी आधुनिक बनल्याचे हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. वाईत डॉल्बीचा दणका अन् फटाक्यांची आतषबाजीवाई : वाई तालुक्यात पारंपरिक पद्धतीने बेंदूर सण उत्साहात साजरा करण्यात आला. काही ठिकाणी डॉल्बीच्या तालावर वाजतगाजत मिरवणुका निघाल्या तर काही गावांमध्ये ढोल-ताशा, लेझिम पथक अशा पारंपरिक पद्धतीने बैलांच्या गावातून मिरवणुका काढल्या. तसेच घरोघरी पूजा करून बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला.मल्हारपेठ परिसरात बेंदूर सणाची परंपरा कायम ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी बैलांची धामधुमीत मिरवणूक काढून सण साजरा केला. खंडाळा तालुक्यात सर्जा-राजाची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.बैलांच्या शिंगांना बेगड, फुगे लावले होते. तर पाठीवर रेशमी झूल टाकली होती. ग्रामदैवताचे दर्शन घेऊन मिरवणुका निघाल्या. त्यानंतर चिमुरड्यांनी बैलांभोवती गोल फेऱ्या मारत ‘चावार चावार चांगभलं, पाऊस आला चांगभलं... असा घोष करीत सण साजरा केला.बैल रंगविण्याचा हटके प्रयोगकिडगाव : बेंदराला शेतकरी आपल्या बैलांना इतरांपेक्षा हटके पद्धतीने सजविण्याचा प्रयत्न करत असतो. किडगाव, ता. सातारा येथील काही शेतकऱ्यांनी बैलांना रंग देण्यासाठी चक्क स्प्रे पंपाचा वापर केला. शेती पिकविण्यासाठी बळीराजानं बैलाच्या पाठीवर येरे येरे पावसा... असा संदेश लिहून वरुणराजाला हाक दिली आहे.किडगाव, नेले, धावडशी, कळंबे, माळेवाडी, कण्हेर, कोंडवे परिसरात उत्साहात बेंदर साजरा करण्यात आला. महाबळेश्वर तालुक्यातील मेटगुताड, अवकाळे, वाडा कुंभरोशी, मेटतळे, टेकवली, भेकवली, मांघर, पारूट या ठिकाणीही बेंदूर सण साजरा करण्यात आला. (प्रतिनिधी)रंगलेल्या पाठीवर नक्षीदार झूलसणानिमित्त बळीराजाने भल्या सकाळी बैलांना गरम पाण्याने अंघोळ घातल्यानंतर सजविण्याचे काम सुरू झाले. सहकुटुंब बैलांना सजविण्यासाठी हातभार लावत होते. कुणी पाठीला रंग देत होते, तर महिला, चिमुरडी नक्षीकाम करत होते. रंगविलेल्या पाठीवर नक्षीदार झूल टाकून बैलांची मिरवणूक काढण्यात आली.शेतीलाही नैवेद्य अन् वृक्षारोपणबेंदरादिवशी आंब्याच्या पानांचे तोरण घराच्या चौकटीला बांधले जाते. तसेच शेतात जाऊन काळ्या आईची पूजा करून नैवेद्य दाखविला जातो. झाडांची लागवडही केली जाते.भुर्इंजमध्ये मिरवणुकीतून कलाम यांना श्रद्धांजलीभुर्इंज : बेंदूर सणानिमित्त येथील शेतकऱ्यांनी काढलेल्या मिरवणुकीत भारतरत्न डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांना श्रध्दांजली अर्पण केल्याने उत्साहाचा हा बेंदूर सण काहीसा हळवा झाला. येथील किसन वीर कारखान्याचे आर्किटेक्चर अमोल भोसले यांनी कलाम यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर बेंदूर सण साजरा करायचा की नाही याबाबत साऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी मुक्या जनावरांनाचा हा सण वर्षातून एकदाच येत असून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतानाच डॉ. कलाम यांनाही श्रध्दांजली अर्पण करण्याचा निर्णय घेण्यात आला. भोसले यांनी बैलांच्या पाठीवर कलाम यांची प्रतिकृती रेखाटून त्यांना अर्पण केलेली श्रध्दांजली संपूर्ण गावात चर्चेचा विषय ठरली.