शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
2
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
3
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
4
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
5
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
6
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
7
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
8
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
9
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
10
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
11
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
12
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
13
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
14
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
15
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
16
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
17
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
18
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
19
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
20
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)

मलकापुरात सांडपाण्यावर होणार प्रक्रिया

By admin | Updated: May 3, 2016 00:52 IST

पहिला टप्पा दहा जूनला सुरू : सभेत एकमुखी ठराव; विविध विषयांवर सकारात्मक चर्चा --मलकापूर नगरपंचायत विशेष सभा

मलकापूर : येथील नगरपंचायतीच्या सभेत २ कोटींच्या विकासकामांबरोबरच ४२ कोटींच्या सांडपाणी प्रक्रिया योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. टप्पा १० जूनला सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव एकमुखाने घेण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा कल्पना रैनाक होत्या. सभेचे विषयवाचन उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी केले. मुख्याधिकारी राजेंद्र तेली यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. पहिल्यांदाच नगरपंचायत सभागृह सोडून माळीनगर येथील सांडपाणी प्रक्रिया योजनेच्या एसटीपी जवळ उघड्यावरील मंडपात सभेचे आयोजन करण्यात आले होते. विषय पत्रिकेवरील ३ विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विषय क्रमांक एक हा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने न्यायालयात दाखल केलेल्या दाव्याबाबत चर्चा करून निर्णय घेणे हा होता. २ मे रोजी या दाव्याची तारीख असून, त्यावेळी मलकापूर शहराने सांडपाणी कोयनानदीत मिसळल्यावर काय उपाययोजना केली हे सादर करावे लागणार आहे, असे शिंदे यांनी सांगितले. जलअभियंता यू.पी. बागडे यांनी सांडपाणी प्रक्रिया योजनेच्या कामाबाबत माहिती दिली. योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. केवळ शेवटची मेन पाईपलाईन टाकणे बाकी आहे. शेतकऱ्यांबरोबर चर्चा झाली आहे. उर्वरित टप्प्याचे काम २४ तास काम करून १० जूनला हा पहिला टप्पा सुरू होईल. त्यानंतर मलकापूरचे सांडपाणी कोयना नदीत जाणार नाही. पाईपलाईनचे काम अपुरे राहिले तरी नदीकडे जाणारे दोन ओढे आडवून ते पाणी एसटीपीमध्ये शुद्ध करून पुढे सोडले जाणार आहे, अशी माहिती दिल्यानंतर हे काम लवकर पूर्ण करण्यासाठी सर्व नगरसेवक सहकार्य करतील, असा विश्वास देण्यात आला. १४ व्या वित्त आयोगातून १ कोटी ९० लाखांच्या निधीतून ८० टक्के म्हणजेच १ कोटी ५४ लाखांत घनकचरा प्रकल्पाच्याही पहिल्या टप्प्याचे काम करण्याचा ठराव करण्यात आला. उर्वरित ३६ लाखांत पाणीपुरवठा टाक्यांची सुरक्षितता, प्रलंबित कामे करण्यास मंजुरी देण्यात आली. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार... सांडपाणी प्रक्रिया योजनेच्या पहिल्या टप्प्यातील शेवटच्या मेन पाईपलाईनचे काम आगाशिवनगर परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनीतून करावे लागणार आहे. हे काम करताना ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होणार आहे. त्यांच्या पिकांचे तज्ज्ञांकडून मूल्यमापन करून नुकसान भरपाई देण्याचा ठराव करण्यात आला. ९ महिन्यांत ८० टक्के कामअत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ४२ कोटींची सांडपाणी प्रक्रिया योजना सत्यात उतरवणारी राज्यातील पहिलीच नगरपंचायत आहे. १९ आॅगस्ट २०१५ रोजी योजनेच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. केवळ ९ महिन्यांतच योजनेचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, जून महिन्यात पहिला टप्पा कार्यान्वित होणार आहे. प्रभागनिहाय सभा घ्या...नगरपंचायत स्थापनेनंतर पहिल्यांदाच प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी उघड्यावर सभा घेण्यात आली. अशा पद्धतीने सर्वसाधारण सभा या प्रभागनिहाय घ्याव्यात, अशी सूचना महिला नगरसेविकांनी मांडली.