लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : विजेच्या खांबावर शॉक लागून खाली पडल्याने रामचंद्र बाबूराव भिसे (वय ५८, रा. पिलेश्वरी नगर, म्हसवडे रोड सातारा) यांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास जकातवाडी, ता. सातारा येथे घडली. दरम्यान या घटनेनंतर नातेवाइकांनी दोषी असणाºया अधिकारी आणि वायरमनवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रामचंद्र भिसे हे गेल्या तीन वर्षांपासून खासगी वायरमनचे काम करतात. ते सध्या ठेकेदार पद्धतीने वीज वितरणकडे काम करत होते. जकातवाडी येथे वीजेच्या खांबावर बिघाड झाल्याने ते आपल्या अन्य सहकाऱ्यांसह तेथे गेले होते. खांबावर चढून दुरुस्ती करत असताना मेन लाईनला त्यांचा हात लागला. त्यामुळे त्यांना जोरदार विजेचा धक्का बसल्याने ते खांबावरून खाली पडले. त्यांच्या डोक्यालाही गंभीर जखम झाली. सहकाºयांनी त्यांना तत्काळ खासगी दवाखान्यात नेले. मात्र, मध्यरात्री उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.भिसे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पहाटे पाचच्या सुमारास नेण्यात आला. नातेवाइकांना या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. जोपर्यंत संबंधितांवर गुन्हे दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाइकांनी घेतली होती. त्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करू, असे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला.महिन्यातील दुसरी घटना..गेल्या आठवड्यात शाहूनगरमध्ये अशाच प्रकारे विजेच्या खांबावर काम करताना खाली पडून एका खासगी वायरमनचा मृत्यू झाला होता. आता दुसºयांदा ही घटना घडल्यामुळे खासगी वायरमनच्या सुरक्षिततेचा प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आला आहे.मुख्य लाईन सुरूच होती..खांबावर काम करण्यापूर्वी वीजप्रवाह बंद केला जातो. त्यानंतरच खांबावर चढून दुरुस्तीचे काम केले जाते, असे असताना रामचंद्र भिसे यांना खांबावर कोणी चढवले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही नातेवाइकांनी केली आहे.
विजेच्या खांबावर शॉक लागून खासगी वायरमनचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 13:42 IST
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : विजेच्या खांबावर शॉक लागून खाली पडल्याने रामचंद्र बाबूराव भिसे (वय ५८, रा. पिलेश्वरी नगर, ...
विजेच्या खांबावर शॉक लागून खासगी वायरमनचा मृत्यू
ठळक मुद्देविजेच्या खांबावर शॉक लागून खासगी वायरमनचा मृत्यूजकातवाडी येथील घटना : अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याचा नातेवाइकांचा आरोप