शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

खासगी सावकारी फोफावतेय

By admin | Updated: November 21, 2014 00:28 IST

वडूजमध्ये तक्रारीनंतर छापे : इतरांबाबत प्रशासनाची गांधारीची भूमिका

वडूज : दुष्काळी तालुक्यात खासगी सावकारीचे जाळे निर्माण झाले असून, अधिकृत कमी मात्र अनधिकृत सावकारांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे. याबाबत कायदा कडक असला तरी अशा सावकारांना शोधून त्यांच्यावर कारवाई करणे प्रशासनाला मोठे आव्हान ठरत आहे. बुधवार, दि. १९ रोजी वडूज येथील गोकुळ ज्वेलर्स व दक्ष ज्वेलर्ससह चार ठिकाणी खासगी सावकारीप्रकरणी छापा टाकला असता काही आक्षेपार्ह कागदपत्रे व नोंदवह्या जप्त करण्यात आल्या असल्याची माहिती सहायक निबंधक प्रीती काळे यांनी दिली. गोकुळ ज्वेलर्सचे मालक विनोद पवार व दक्ष ज्वेलर्सचे मालक देविदास बागल हे खासगी सावकारी करत असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आली होती.त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्हा उपनिबंधकांना कारवाईचे आदेश देण्यात आले होते. बुधवार, दि. १९ रोजी सहायक निबंधक प्रीती काळे यांनी पवार व बागल यांच्या ज्वेलर्स व घरावर चार पथकांद्वारे छापे टाकले. या छाप्यात आक्षेपार्ह दस्ताऐवज, नोंदवह्या आढळून आल्या असून, ही कागदपत्रे जप्त करण्यात आली. संबंधित कागदपत्रे तपासणीसाठी जिल्हा उपनिबंधकांकडे पाठविण्यात आली आहेत.या कारवाईने खासगी सावकारांचे धाबे दणाणले असून याबाबत तक्रारी वाढण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)वाड्या-वस्त्यांपर्यंत साखळीसध्या खटाव तालुक्यात हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच सावकारांकडे सावकारीचा अधिकृत परवाना असून, परवाना नूतनीकरणासाठी किंवा रद्द करण्याबाबत काही जणांना सहायक निबंधक कार्यालयातून दि. २० सप्टेंबर रोजी नोटिसा बजविण्यास आल्याची माहिती कार्यालयातून देण्यात आली.ाालुक्यात परवानाधारक सावकारांची संख्या कमी असली तरी खरी वस्तुस्थिती वेगळीच आहे. विनापरवाना खासगी सावकारांची साखळी गाव तसेच वाड्या-वस्त्यांवर कार्यरत असून, आजअखेर कोणतीच तक्रार दाखल नसल्याने हा व्यवसाय फोफावत आहे.