शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘कृष्णे’त पृथ्वीराज चव्हाण सक्रिय !

By admin | Updated: June 18, 2015 00:44 IST

उंडाळकर पिता-पुत्रांच्याही जोर बैठका : एन. डी. पाटील, पंतगराव कदम, भारत पाटणकरांच्याही सभा

प्रमोद सुकरे -कऱ्हाड -यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत यंदा प्रथमच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सक्रिय झाले आहेत. माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर व त्यांचे पुत्र उदय पाटील यांनीही बैठका घेत जोर बैठका सुरू केल्या आहेत. तर ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, डॉ. भारत पाटणकरांच्या सभांनी प्रचारात रंगत आली आहे. दिल्लीत रमणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांनीही विधानसभेची निवडणूक जिंकल्यापासून आपल्या मतदारसंघात चांगलेच लक्ष घातल्याचे पाहायला मिळते. जवळजवळ दर शनिवार-रविवार कऱ्हाडात येऊन त्यांनी संपर्क वाढविला आहे. त्याही पुढे जाऊन मतदारसंघाशी संबंधित असणाऱ्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत त्यांनी प्रथमच लक्ष घातले आहे. मदनराव मोहिते यांच्या नेतृत्वाखालील रयत पॅनेलच्या प्रचारासाठी बुधवारी काले येथे त्यांची जाहीर सभा झाली. गुरुवारी कार्वे, वारुंजी, विंग जिल्हा परिषद मतदार संघातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या तीन बैठका घेतल्या असून, शुक्रवारी वाठार येथे होणाऱ्या जाहीर सभेलाही ते मार्गदर्शन करणार आहेत. यशवंतराव मोहितेंचे मानसपुत्र माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम महिन्याभरापासून ठिकठिकाणी प्रचारात दिसत आहेत.नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील वैर बाजूला ठेवून विलासराव पाटील-उंडाळकर गटाने डॉ. सुरेश भोसले गटाशी पुन्हा मैत्रिपर्व सुरू केले आहे. कृष्णेच्या निवडणुकीत त्यांनी डॉ. सुरेश भोसलेंच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. स्वत: विलासराव पाटील-उंडाळकर व त्यांचे पुत्र उदय पाटील कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन सहकार पॅनेलच्या विजयासाठी जोर बैठका काढीत आहेत. प्रचारसभांना प्रतिसादही चांगला मिळतोय.दिग्गज उमेदवार, प्रचारक अन् हायटेक प्रचार !तिरंगी होणाऱ्या या निवडणुकीत कृष्णेचे विद्यमान अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्यासह माजी अध्यक्ष व कृष्णा उद्योग समूहाचे प्रमुख डॉ. सुरेश भोसले, भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष व कृष्णेचे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते, कृष्णेचे माजी अध्यक्ष मदनराव मोहिते यांच्यासह अनेक आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य प्रत्यक्ष उमेदवार आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर, ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील प्रचारात उतरले आहे. तर प्रचार गीते, एल. ई. डी. प्रोजेक्टरच्या माध्यमातून चित्रफिती अन् सोशल मीडियाच्या माध्यमातूनही हायटेक प्रचार सुरू आहे.दिग्गज उमेदवार, प्रचारक अन् हायटेक प्रचार !तिरंगी होणाऱ्या या निवडणुकीत कृष्णेचे विद्यमान अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्यासह माजी अध्यक्ष व कृष्णा उद्योग समूहाचे प्रमुख डॉ. सुरेश भोसले, भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष व कृष्णेचे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते, कृष्णेचे माजी अध्यक्ष मदनराव मोहिते यांच्यासह अनेक आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य प्रत्यक्ष उमेदवार आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर, ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील प्रचारात उतरले आहे. तर प्रचार गीते, एल. ई. डी. प्रोजेक्टरच्या माध्यमातून चित्रफिती अन् सोशल मीडियाच्या माध्यमातूनही हायटेक प्रचार सुरू आहे.सन १९८९ मध्ये यशवंतराव मोहिते व जयवंतराव भोसले यांच्यात कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून संघर्ष सुरू झाला. त्यावेळी विलासराव पाटील-उंडाळकरांनी भोसलेंची पाठराखण करीत जाहीर सभांमधून सहभाग घेतला होता. त्यानंतर कृष्णेच्या निवडणुकीत नेहमीच त्यांनी भूमिका घेतली; पण पडद्यामागे राहून.