शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अगोदर अजित पवारांची अतिक्रमणे काढा !

By admin | Updated: February 26, 2016 00:48 IST

उदयनराजेंनी प्रशासनाला ठणकावले : उंब्रजची अतिक्रमण हटाव मोहीम तात्पुरती स्थगित

उंब्रज : येथील बाजारपेठेतील अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान खा. उदयनराजे भोसले यांनी ‘अजित पवार व इतर नेत्यांची अगोदर अतिक्रमणे काढा, गोरगरीब व्यापाऱ्यांचे दुकान गाळे पाडून त्यांचे संसार उद्ध्वस्त करू नयेत,’ असे तहसीलदारांना जोरदारपणे ठणकावताच प्रशासनाने ही मोहीम तत्काळ स्थगित केली. ‘जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. तुम्ही त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधा व तातडीने हे काम बंद करा,’ असेही उदयनराजे ंनी ठणकावून सांगताच तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन अतिक्रमणविरोधी मोहीम स्थगित ठेवण्याचा तोंडी आदेश संबंधितांना दिला. गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास येथील अतिक्रमण हटाव मोहीम सुरू होणार होती. परंतु शिवसेनेचे कऱ्हाड उत्तरचे माजी तालुकाप्रमुख समीर जाधव, नरेंद्र पाटील, संजय मोहिते यांनी व्यापाऱ्यांशी चर्चा केली. यानंतर हे तिघे काही व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींना घेऊन उंब्रज पोलीस ठाण्यात गेले. तेथे नरेंद्र पाटील यांनी तहसीलदार राजेंद्र शेळके, उंब्रज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एम. के. पाटील यांच्याशी चर्चा केली. ‘संबंधित गाळेधारक अल्पभूधारक आहेत. काही मागासवर्गीय आहेत. तरी ही मोहीम राबवू नये,’ असे सांगितले. परंतु ‘संबंधितांना सूचना १५ दिवसांपूर्वीच दिल्या आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करणार आहे. तुम्हाला याबाबत काही तक्रार द्यायची असेल तर लेखी स्वरूपात द्यावी,’ असे सांगून तहसीलदार राजेंद्र शेळके पोलीस बंदोबस्तात बाजारपेठेत गेले. ११ वाजण्याच्या सुमारास अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू केली. या मोहिमेत सहा जेसीबी व सुमारे वीस ट्रॅक्टर सहभागी झाले होते. ११ ते १ वाजेपर्यंत ही मोहीम सुरू होती. या दरम्यान सुमारे ४०-५० दुकान गाळे पाडण्यात आले. या दरम्यान इतर दुकान व्यावसायिकांनी आपल्या दुकानातील माल काढण्यासाठी धावपळ सुरू केली. दरम्यान समीर जाधव यांनी खा. उदयनराजे भोसले यांच्याशी संपर्क साधला व ‘तुम्हीच उंब्रजची बाजारपेठ वाचवू शकता,’ असे सांगितले. त्यानंतर खा. उदयनराजे हे सातारहून तातडीने उंब्रजला आले. त्यांनी उंब्रजच्या बाजारपेठेत ‘एन्ट्री’ केली. ‘अजित पवार व इतर नेत्यांची अतिक्रमणे अगोदर काढा. गोरगरिबांची दुकान गाळे पाडू नका, काम थांबवा,’ असे सांगितले. तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर अतिक्रमण स्थगितीचा आदेश देण्यात आला व ही मोहीम थांबली. (प्रतिनिधी)