शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पत्त्यांच्या क्लबवर छापा; ४३ अटकेत

By admin | Updated: June 16, 2016 01:19 IST

कऱ्हाडात कारवाई : नेत्यांसह प्रतिष्ठितांचा समावेश; अकरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत

कऱ्हाड : कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांच्या आदेशानुसार सांगलीच्या गुंडाविरोधी पथकाने मंगळवारी रात्री कऱ्हाडातील पत्त्यांच्या तीन क्लबवर छापा टाकला. या छाप्यात एकूण ४३ जण पोलिसांच्या हाती लागले असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांमध्ये स्थानिक राजकीय नेत्यांसह अनेक प्रतिष्ठितांचा समावेश आहे. एकाच वेळी झालेल्या या मोठ्या कारवाईने शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा, सांगलीसह कोल्हापूर व पुणे जिल्ह्यांतील जुगार अड्ड्यांवर मंगळवारी रात्री एकाच वेळी छापा टाकण्यात आला. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. संबंधित कारवाईवेळी नजीकच्या जिल्ह्यातील पोलिस पथक पाठविण्यात आले होते. त्यानुसार कऱ्हाडात सांगलीच्या गुंडाविरोधी पथकाने कारवाई केली. मंगळवारी रात्री सांगली पोलिसांची तीन पथके कऱ्हाडात दाखल झाली. एक पथक शहरातील पोपटभाई पेट्रोल पंपानजीक असणाऱ्या इमारतीमध्ये, दुसरे पथक ओगलेवाडीत, तर तिसरे पथक वारुंजी फाटा येथे गेले. संबंधित तिन्ही ठिकाणी एकाच वेळी छापा टाकण्यात आला. शहरातील पोपटभाई पेट्रोल पंपानजीक असणाऱ्या ऐश्वर्या रेडियम या दुकानाच्यावर जावेद बाबू मुल्ला (वय २०, रा. विंग, ता. कऱ्हाड) हा पत्त्याचा क्लब चालवीत होता. त्याठिकाणी छापा टाकून पोलिसांनी २२ जणांना अटक केली. तसेच तेथून २ लाख ४७ हजार ८०२ रुपयांची रोकड, ५६ हजार ७०० रुपयांचे मोबाईल व १ लाख १० हजारांची दुचाकी असा ४ लाख १४ हजार ५०५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. संबंधित क्लबमधील अशपाक मुल्ला व अस्मल पटेल या दोन कामगारांनाही अटक केली आहे. पोलिस नाईक महेश मारुती आवळे यांनी याबाबत कऱ्हाड शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.ओगलेवाडी येथे कल्याणी बिल्डिंगनजीक नरेश प्र्रभुनाथ गुप्ता (रा. बनवडी) हा जुगार अड्डा चालवित होता. सांगलीच्या पोलिस पथकाने रात्री बारा वाजण्याच्या सुमारास त्याठिकाणी छापा टाकला. तेथून नरेश गुप्तासह ६ जणांना ताब्यात घेऊन अटक केली. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोकड, खुर्च्या, टेबल, टीव्ही, गाद्या, दुचाकी, कारसह एकूण २ लाख १२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. पोलिस हवालदार सुनील उमाजी भिसे यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. वारुंजी फाटा येथेही जुगार अड्डा सुरु होता. सांगली पोलिस पथकानेही तेथेही छापा टाकला. तेथून स्थानिक राजकीय नेत्यांसह रेकॉर्डवरील गुन्हेगारांना जुगार खेळताना ताब्यात घेतले. अटक केलेल्यांमध्ये १३ जणांचा समावेश असून, त्यांच्याकडून ४ लाख ८८ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटक केलेल्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. यामध्ये अटक केलेल्यांची नावे अशी: संभाजी काळे (४५, शनिवार पेठ), दिनकर भिंगारदेवे ( विटा), राजू शेख ( विद्यानगर), संतोष देशमुख, रवींद्र मस्के (शनिवार पेठ), प्रवीण कटरे ( बुधवार पेठ), विजय ढवळे, अधिक ताटे (जखिणवाडी), अशोक कुंभार (कोरेगाव), अनिल सावंत (बुधवार पेठ), अजिज पटेल (वारुंजी), भरत भंडारे ( शनिवार पेठ), कृष्णत रैनाक (शनिवार पेठ), विठ्ठल पवार (शुक्रवार पेठ), गणेश जाधव, शिवाजी देसाई (कोयना वसाहत), प्रशांत पाटील (कार्वेनाका), दत्तात्रय साळुंखे (गोटे), जावेद मुल्ला (विंग), अशपाक मुल्ला (मुजावर कॉलनी), अस्लम पटेल (वारुंजी).ओगलेवाडी येथे जुगार अड्ड्यावर नरेश गुप्ता ( बनवडी), विनोद वीरकायदे ( हजारमाची), नारायण कांबळे (बुधवार पेठ), सोमनाथ सूर्यवंशी ( ओगलेवाडी), महेश सुर्वे ओगलेवाडी), कुमार पळसे ( हजारमाची). विजय मोरे मन्सूर मुल्ला, सुनील माळी ( कालेटेक), सचिन माने ( नांदगाव), वसंत पवार (देवराष्ट्रे), दत्ताजीराव डुबल (शुक्रवार पेठ) वारुंजी फाटा येथील कारवाईत विजय पवार - मलकापूर), विजय तिवारी, राजेश ओसवाल , राजाराम कुंभार , लाजम अल्लाउद्दीन खोडेकर अधिकराव पाटील, दीपक लिमकर ( ओगलेवाडी), विजय मोरे (शनिवार पेठ), मन्सूर मुल्ला (, गुरुवार पेठ), सुनील माळी (कालेटेक), सचिन माने ( नांदगाव), वसंत पवार (, देवराष्ट्रे), दत्ताजीराव डुबल (६३, शुक्रवार पेठ).