शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रधानमंत्री श्रमयोगी’त सातारा राज्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 22:57 IST

सागर गुजर । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेत सातारा जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. या ...

सागर गुजर ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेत सातारा जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. या योजनेसाठी जिल्ह्यातील १७ हजार ७३५ कामगारांची नोंद झाली आहे. पुणे दुसऱ्या तर अमरावती तिसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्हा प्रशासनाने ताकदीने राबविलेल्या कार्यपद्धतीमुळे मोठ्या प्रमाणावर कामगारांच्या भविष्याचा प्रश्न सुटणार आहे.या योजनेच्या नोंदणीमध्ये सातारा जिल्हा सुरुवातीपासूनच अव्वल ठरला आहे. रविवारअखेर सातारा जिल्ह्यातील १७ हजार ७३५ कामगारांची या योजनेसाठी नोंद झाली. पुणे जिल्हा दुसºया क्रमांकावर असून, तिथे १२ हजार ३८६ कामगारांची नोंद झाली. तर अमरावती हा जिल्हा ११ हजार ५९२ कामगारांची नोंद करून तिसºया क्रमांकावर राहिला आहे. मुंबई जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे अवघ्या ४५७ जणांची नोंद झाली आहे. इतर जिल्ह्यांतील नोंदणीही सातारा जिल्ह्याच्या तुलनेत फारच कमी आहेत.केंद्र शासनाने असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षिता पुरविण्याच्या उद्देशाने दि. ३१ डिसेंबर २०१८ रोजी असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम २००८ पारित केला. त्या अनुषंगाने विविध व्यवसाय गट जसे बांधकाम कामगार, घरेलू कामगार, फेरीवाले, शेतमजूर, गृह उद्योगातील कामगार, माथाडी कामगार, बिडी कामगार, यंत्रमाग कामगार, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यासारख्या विविध १२७ व्यवसाय गटातील असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना लागू करण्याबाबतचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. या योजनेची कार्यवाही १५ फेब्रुवारी २०१९ पासून सुरू करण्यात आली.या योजनेत असंघटित क्षेत्रात काम करणारा १८ ते ४० वयोगटातील कामगार ज्याचे उत्पन्न १५ हजार रुपयांपेक्षा कमी आहे. कर्मचारी राज्य बिमा नियम, भविष्य निर्वाह निधी अथवा राष्ट्रीय पेन्शन योजनेचा सभासद नसणारा कामगार पात्र ठरणार आहे.१८ ते ४० वयोगटातील लाभार्थीने त्याच्या वयानुसार निर्धारित केलेल्या हप्त्यानुसार ५५ रुपये ते २०० रुपयांपर्यंत प्रतिमहिना अंशदान जमा केल्यास लाभार्थ्यास वयाची ६० वर्षे पूर्ण केल्यानंतर दरमहा ३ हजार रुपये निवृत्तीवेतन देय राहणार आहे. ग्रामपंचायत स्तरावर आपले सरकार व नागरी सुविधा केंद्रात ही नोंदणी सुरू आहे.पंतप्रधानांच्या हस्ते आज उदघाटनप्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचे उद्घाटन ५ मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. जिल्हा परिषदेमध्ये याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.