सातारा : जिल्हा परिषदेच्या २०१६-१७ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाला सोमवारी मंजुरी देण्यात आली. अर्थ समितीचे सभापती पदावर नसल्याने हा अर्थसंकल्प मंजूर करता येणार नाही, असा पवित्रा विरोधकांनी घेतला होता. मात्र, अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी हा कायदेशीर अधिकार माझ्याकडे आहे, असे सांगत अर्थसंकल्प मांडला. या सभेत २५ कोटी ४८ लाख रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली.मागील आठवड्यात अर्थसंकल्पीय सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील उपस्थित नसल्याचा मुद्दा राष्ट्रवादीच्या बहुतांश सदस्यांनी उपस्थित केल्याने सभा रद्द करावी लागली होती. हाच धागा पकडून सोमवारच्या सभेपूर्वी अर्थ समितीच्या सभापतींची निवड झाली नसताना अर्थसंकल्प मांडता येणार नाही, असा पवित्रा विरोधी काँगे्रस व भाजपच्या काही सदस्यांनी घेतला होता; पण अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी विरोधकांना प्रत्युत्तर देत सभेचे कामकाज सुरू ठेवले. राष्ट्रवादीचे सदस्य अनिल देसाई व काँगे्रसचे जालिंदर पाटील, भाजपचे दीपक पवार यांनी एकाचवेळी मते मांडायला सुरुवात केल्याने सभागृहात काही काळ गोंधळ उडाल्याचे चित्र दिसले. पवार यांनी मांडलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ‘त्यावेळेचा निर्णय त्यावेळी..आताचा निर्णय आता,’ असे सांगत चतुराई दाखवली. त्यानंतरही काँग्रेसचे सदस्य मुद्दे उपस्थित करत होते; परंतु पूर्वी तहकूब केलेली मिटिंग असल्याने यात सविस्तर बोलता येणार नाही, असे स्पष्ट करत उपाध्यक्ष रवी साळुंखे यांनी आभाराचे ‘शस्त्र’ काढले. यानंतर काँगे्रसच्या सदस्यांनी राजीनामा देतच सभागृहाबाहेरचा रस्ता धरला. बाबासाहेबांच्या जयंतीसाठी पाच लाखडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून जयंती थाटात साजरी करण्यासाठी एक लाखावरून थेट पाच लाखांच्या तरतुदीला मान्यता दिल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी सांगितली. - संबंधित वृत्त पान २
अध्यक्षांनीच मांडला २५ कोटींचा अर्थसंकल्प!
By admin | Updated: March 14, 2016 23:58 IST