शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

वाद घालायला सापडते अध्यक्षांचेच दालन!

By admin | Updated: October 8, 2015 00:57 IST

वाद थांबला... मन मोकळे झाले : सोनवलकर--जिल्हा परिषदेतून

सातारा : मिनी मंत्रालय अशी ओळख असणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा आहे. या पदाचा मान प्रत्येकानेच राखणे अपेक्षित आहे. त्यांच्या दालनात वाद नव्हे, तर संवाद घडणे अपेक्षित आहे. कोरेगाव ग्रामपंचायतीत ग्रामविकास अधिकारी नेमण्यावरून याच दालनात मंगळवारी जोरदार शाब्दिक चकमक उडाली. प्रसंगावधान ओळखून अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी या वादावर पडदा टाकला. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेनुसार जिल्ह्याचे निर्णय जिल्ह्यात व्हावेत, हा या हेतूने राज्यात त्रिस्तरीय पंचायत राज अस्तित्वात आले. प्रत्येक गावाला आर्थिक स्थैर्य मिळून विकासकामांना गती देण्यासाठी जिल्हा परिषद हा महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचा मान कायम ठेवणे अपेक्षित असते. मंगळवारी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात ग्रामसेवक संघटना आणि कोरेगाव ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांच्यात झालेल्या वादावादीचा प्रकार चर्चेचा विषय ठरला आहे. या चर्चेवेळी अध्यक्षांचे दालन बंद होते. अध्यक्षांना भेटण्यासाठी बाहेर अभ्यागतांची रांग लागली होती. दालनातील वाढलेले आवाज व्हरांड्यात प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांच्या कानावर पडत होते. तब्बल दोन तास हा वाद सुरू होता. बाहेर लोक ताटकळत होते. कोरेगावच्या ग्रामविकास अधिकाऱ्याच्या निधनानंतर या ठिकाणी ग्रामविकास अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी होत होती. येथे ग्रामपंचायत असली तरी हे मोठे शहर असल्याने ग्रामविकास अधिकाऱ्याअभावी नागरी सुविधेचे तीन-तेरा वाजले होते. त्यामुळे ग्रामपंचायत पदाधिकारी शिरा ताणून बोलत होते, तर ग्रामविकास अधिकाऱ्यावर ग्रामपंचायत अधिकारी दबाव टाकत असल्याने कुठलाही ग्रामसेवक याठिकाणी जायला तयार नाही, असा युक्तिवाद ग्रामसेवक संघटनेकडून सुरू होता. हा वाद दोन तास चालला. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात असा गोंधळ माजणे कितपत योग्य, अशी जोरदार चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे. वाद थांबला... मन मोकळे झाले : सोनवलकर--जिल्हा  परिषदेतूनकोरेगावात ग्रामविकास अधिकारी नसल्याने गैरसोयी वाढल्या होत्या. नागरी सुविधांचा प्रश्नही निर्माण झाल्याने मी स्वत: या प्रश्नात लक्ष घालण्याचे ठरविले. ग्रामसेवक संघटना व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना एकत्र बसवून चर्चा केल्याशिवाय प्रश्न सुटणार नव्हता, त्यामुळे मी त्यांना बोलावले होते. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, कोरेगावचे गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारीही यावेळी उपस्थित होते. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून दबाव येतो व ग्रामविकास अधिकाऱ्यांना काम करताना अडचणी येतात, असा ग्रामसेवक संघटनेचा आरोप होता. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन निर्णय घेणे गरजेचे होते. अनेकांनी माझ्यापुढे मन मोकळे केले. ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवक संघटना यांच्यामध्ये सुवर्णमध्य काढला. यामुळे आता कोरेगाव ग्रामपंचायतीमधील तणाव कमी होईल. कोरेगावसाठी तात्पुरता ग्रामविकास अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. कामकाज चांगले चालले तर त्याच अधिकाऱ्याला पुढच्या कालावधीसाठी नेमणूक दिली जाईल, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.