शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाड ग्रामीणचा विकास आराखडा नगर पालिकेच्या सभेत सादर

By admin | Updated: July 9, 2014 00:04 IST

प्रसिद्ध करण्यास एकमताने मंजुरी

कऱ्हाड : शहराच्या वाढीव हद्दीची नगररचना विभागाने तयार केलेली प्रारूप विकास योजना व अहवाल पालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेपुढे सादर होऊन तो प्रसिद्ध करण्यास एकमताने मंजुरी देण्यात मिळाली. हद्दवाढ भागातील ७४०.८९ हेक्टर क्षेत्रापैकी ४११ .७१ हेक्टर क्षेत्र विकासासाठी प्रस्तावित असून ३०० हेक्टर क्षेत्र रहिवासासाठी ठेवले आहे. हद्दवाढ भागात १९ प्रकारची आरक्षणे ठेवली आहेत. ३२७.१२ हेक्टर शेती व नो डेव्हलपमेंट झोनसाठी प्रस्तावित केले आहे. आरक्षणे व रस्त्यांसाठी एकूण ५८.७४ हेक्टर क्षेत्र पालिकेला संपादीत करून त्याच्या विकासासाठी ३२०.८९ कोटी खर्चही अपेक्षित आहे. पालिका सभागृहात पार पडलेल्या या विशेष सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा उमा हिंगमिरे होत्या. शहराची नव्याने हद्दवाढ झालेल्या कऱ्हाड ग्रामिणचा विकास आराखडा सभेत सादर झाला. यावेळी नगररचना अधिकारी श्रीकांत देशमुख व सहकारी उपस्थित होते. सभेच्या सुरूवातीला प्रशासकिय अधिकारी राजेश काळे यांनी सूचना मांडली. त्यावर सत्ताधारी आघाडीचे अध्यक्ष सुभाष पाटील यांनी विकास आराखड्याचे काय निकष आहेत, याबाबतची मागणी केली. त्यावर देशमुख यांनी प्रारूप विकास आराखड्याबाबत सविस्तर माहिती दिली. मुळ शहरातील आरक्षणाचा विचार करून हद्दवाढ भागात कमीत कमी आरक्षणे ठेवल्याचे त्यांनी सांगितले. त्यामध्ये बगीच्यासाठी सहा, क्रीडांगणासाठी सहा, प्राथमिक शाळा व मैदानासाठी ६, प्रसुतीगृह व दवाखान्यासाठी एक, भाजीमंडई व शॉपींग सेंटरसाठी तीन, मटण व फिश मार्केटसाठी एक, पंपींग स्टेशनसाठी दोन, अग्निशामक केंद्रासाठी एक, विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी दोन, पालिका प्रशासकिय इमारतीसाठी एक, हॉकर्स झोनसाठी, पोलीस चौकीसाठी, एसबीआयसाठी, वीज कंपनीच्या उपकेंद्रासाठी प्रत्येकी एक, घनकचरा निर्मुलनाकरीता केंद्र उभारणे, कत्तलखान्यासाठी प्रत्येकी एका ठिकाणी आरक्षण प्रस्तावित केले आहे. (प्रतिनिधी)