शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
2
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
3
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
6
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
7
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
8
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
9
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
10
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
11
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
12
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
13
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
14
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
15
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
16
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
17
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
18
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
19
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
20
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!

उदयनराजेंच्या आघाडीत सर्वपक्षीयांची उपस्थिती

By admin | Updated: December 28, 2016 00:45 IST

‘राजधानी सातारा’ची अधिकृत घोषणा : प्रस्थापित राजकारण्यांनी लोकांना बाद केल्याचा आरोप

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी विविध पक्षांतील नाराज पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन मंगळवारी राजधानी सातारा विकास आघाडीची घोषणा केली. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक या आघाडीच्या माध्यमातूनच लढली जाईल, असे सूतोवाच त्यांनी केले. तसेच प्रत्येक तालुक्यातून धडाडीचे व तळमळीचे उमेदवार निवडण्याची सूचनाही केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निर्मितीला ५५ वर्षे उलटून गेली तरी शेतकऱ्यांचे व कष्टकऱ्यांचे प्रश्न कायम आहेत. राजकारणी मंडळी लोकांच्या मतांच्या बळावर निवडून येतात आणि नंतर त्यांना विसरून जातात. सातारा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण देशात व्यक्तीकेंद्रित राजकारणाचा उदोउदो सुरू आहे. आपण कुठल्याही पदाला फारशी किंमत दिली नाही. प्रस्थापित मंडळी मलाही त्यांच्यातीलच समजत होते; त्यांच्यासोबत राहून मला खूप काही साध्य करता आले असते. पण मला ते करायचे नव्हते. वर्षानुवर्षे खितपत पडलेल्या शेतकरी व कष्टकऱ्यांना प्रगतीच्या वाटेवर नेण्यासाठी राजधानी सातारा विकास आघाडीचा विचार आपण सर्वांपुढे मांडत आहोत, असे उदयनराजेंनी स्पष्ट केले. जिल्ह्यात चांगले काम करणाऱ्या अनेकांना बाजूला काढण्याचे पाप राजकारणी मंडळी करत आहेत, असा आरोप करून उदयनराजे म्हणाले, ‘अलीकडे शिफारशीशिवाय उमेदवारी मिळत नाही. मी आणि माझे कुटुंब यापलीकडे राजकारणी जायला तयार नाहीत. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवी साळुंखे यांनी प्रास्ताविक तर जिल्हा काँगे्रसचे सरचिटणीस सुनील काटकर यांनी स्वागत केले. बैठकीला कृषी सभापती शिवाजीराव शिंदे, साताऱ्याच्या नगराध्यक्षा माधवी कदम, सदाशिव सपकाळ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय भगत, शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शंकर गोडसे, शंकर शिंदे, राहुल कदम, युवक काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. श्रीकांत चव्हाण, धर्माप्पा जगदाळे, वाईचे माजी सभापती विजयराव नायकवडी, प्रल्हाद चव्हाण, सयाजीराव शिंदे (जावली), भिकू भोसले, यशवंत ढाणे, जिल्हा परिषद सदस्य समृद्धी जाधव, संदीप शिंदे, प्रल्हादराव चव्हाण, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन मोहिते, विवेक भोसले, सातारा तालुका काँगे्रस कमिटीचे अध्यक्ष नंदाभाऊ जाधव, राहुल पाटील, पैलवान बंडा जाधव, बाळासाहेब कदम, विकास जाधव, अर्जुनराव साळुंखे, समीर जाधव, हैबतबापू नलावडे, गुरुदेव बरदाडे, अजयराव धायगुडे, हणमंत चवरे, जिल्हा परिषद सदस्य जालिंदर पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. (प्रतिनिधी)बच्चा समझ के छोड दिया...तुमच्या लॉलिपॉपला मी भीक घालत नाही. कुठलाही लॉलिपॉप मला गप्प ठेवणार नाही. त्यांच्यावर टीका न करता ‘बच्चा समझ के छोड दिया,’ अशा शब्दात उदयनराजेंनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नाव न घेता, त्यांच्यावर टीका केली.