शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गुढीपाडव्यासाठी शाहूनगरी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 22:28 IST

सातारा : चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून सातारनगरी सज्ज झाली आहे. गुढी उभी करण्यासाठी ...

सातारा : चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून सातारनगरी सज्ज झाली आहे. गुढी उभी करण्यासाठी आवश्यक असणारे बांबू, साखरगाठी, कडुनिंबाची पाने खरेदी करण्यासाठी संध्याकाळी बाजारपेठेत गर्दी होती.सूर्योदयाला घरासमोर उंच जागेवर गुढी उभारून तिची पूजा करण्यासाठी आवश्यक असणारी सामग्री सातारकरांनी जमवून ठेवली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा साखर गाठींच्या किमतीत १० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. साखर आणि गॅस वाढल्यामुळे ही वाढ करणं अनिवार्य असल्याचं व्यापाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.गुढीपाडव्याच्या निमित्ताने घरात नवीन वस्तू, सुवर्ण खरेदी करण्याकडे सातारकरांचा कल असतो. ही मुहूर्ताची खरेदी ग्राहकांनी आपल्याकडे करावी, यासाठी बाजारपेठेत अनेक आॅफर्स दाखल झाल्या आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेकांनी दुकानांवर विद्युतरोषणाईही केली आहे.हातगाड्यांवरही साखरगाठी!साताऱ्याच्या बाजारपेठेत यंदा हातगाड्यांवर साखरगाठी उपलब्ध असल्याचं चित्र पाहायला मिळालं. या साखरगाठी तयार करणारे उत्पादक आणि उत्पादनाचं ठिकाण हे दोन्ही ज्ञात नसल्यामुळे ही साखरगाठी खाणं आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकते, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहेत. साताºयात ठिकठिकाणी कामे सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमणावर त्याची धूळ या साखरगाठीवर बसत असल्याचे निरीक्षणही काहींनी नोंदविले.