शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांविरोधात आंदोलनाची तयारी

By admin | Updated: September 6, 2016 01:39 IST

अ‍ॅट्रॉसिटी प्रतिक्रिया : आंबेडकरप्रमी कार्यकर्त्यांकडून निषेधाचे पत्रक

सातारा : शाहू, फुले आणि आंबेडकर विचारांचा वारसा लाभलेल्या पुरोगामी महाराष्ट्रात काही अपवाद वगळता मराठा आणि मागासवर्गीय समाज गुण्या-गोविंदाने राहत आहेत, ज्या-ज्यावेळी महाराष्ट्रात मागासवर्गीयांवर आणि संबंधित महिलांवर अत्याचाराच्या भीषण घटना घडल्या त्यावेळी शरद पवार यांनी त्यांच्याप्रती कधी सांत्वन अथवा आधार देण्याचे काम केले नाही. किंवा अ‍ॅट्रॉसिटी कायदा कडक करावा म्हणून मागणी केली नाही, असा आरोप रिपब्लिकन पक्षाचे संजय गाडे यांनी एका पत्रकाद्वारे केला आहे. पत्रकात पुढे म्हटले आहे की, केवळ कोपर्डी प्रकरणात राजकीय हित साधण्यासाठी बीड आणि उस्मानाबाद येथे सुनियोजित निषेध आंदोलनाचा विराट मोर्चा काढून समाजाला मागासवर्गीय समाजावर हिंसक होण्यास भाग पाडत आहे. केवळ रामदास आठवले यांच्या भाजप युतीच्या भूमिकेमुळेच महाराष्ट्रातील सत्ता हातातून निघून गेल्याने हताश झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जातीय तेढ निर्माण व्हावी, राज्यात अशांतता निर्माण व्हावी आणि पुन्हा एकदा सत्तेचे झुकते माप आपल्याला मिळावे, या हेतूने प्रेरित होऊन अ‍ॅट्रॉसिटी कायद्याबाबत वक्तव्य करून राज्यात जात-धर्मातील एकसंधतेला छेद देण्याचा प्रयत्न केलेला आहे.महापुरुषांचा वारसा लाभलेल्या राज्यात केवळ सत्तेपोटी अशी दोन जातीत तेढ निर्माण करणारी वक्तव्य शरद पावर यांना शोभणारी नाही आणि राज्यात गुण्या-गोविंदाने राहणाऱ्या सर्वांनाच अनुकूल नाही. याचा गांभीर्याने विचार करून श्रमिक ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दादा ओव्हाळ, विजय गायकवाड, मदन खंकाळ यांच्यासह रिपाइं कार्यकर्ते दि. ९ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालय समोर एल्गार आंदोलन करून शरद पवार यांचा निषेध करणार असल्याचे गाडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी) तेढ निर्माण करण्याचे पवारांचे निंदनीय कामराजकारणातील धुरंधर म्हणून ओळख असणाऱ्या पवार यांना आठवले भाजप, सेना व इतर मित्र पक्षांशी युती केल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली. कायम सत्तेत राहण्याची सवय झालेल्या पवार यांना ही बाब रुचलेली नाही. भविष्यात असाच फॉर्म्युला राहिल्यास सत्तेचे फळ चाखता येणार नाही. याची खात्री झाल्यानेच तेढ निर्माण कसे होईल, त्यासाठी पवार यांनी चालवलेला प्रयत्न निंदनीय आहे, असेही पत्रकात म्हटले आहे.