शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
6
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
7
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
8
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
9
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
10
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
11
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
12
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
13
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
14
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
15
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
16
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
17
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
18
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
19
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
20
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान

प्रतापसिंह महाराजांचे चरित्र जगासमोर येण्याची गरज

By admin | Updated: January 19, 2015 00:21 IST

दत्तप्रसाद दाभोलकर : प्रतापसिंह महाराज स्मृती पुरस्काराचे वितरण

सातारा : ‘सातारचे प्रतापसिंह महाराज अनेक कारणांनी मोठे होते. त्यांचे चरित्र विविध भाषामधून आणने काळाची गरज आहे’, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर यांनी केले. प्रतापसिंह महाराजांच्या २२२ व्या जयंतीनिमित्त सातारा नगरपरिषदेच्या वतीने विविध कार्यक्रमांद्वारे अभिवादन करण्यात आले. यानिमित्त ‘श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) स्मृती’ पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार माजी नगराध्यक्ष शिवाजीराजे भोसले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. संभाजीराव पाटणे, नगराध्यक्ष सचिन सारस, उपनगराध्यक्षा दिनाज शेख, अमोल मोहिते, हेमा तपासे, मुख्याधिकारी अभिजित बापट उपस्थित होते.पुरस्काराला उत्तर देताना दाभोलकर म्हणाले, ‘पुरस्कार देशपातळीवरीलही मिळतात; पण घरच्या माणसांनी पाठीवर टाकलेली शाबासकीची थाप जबाबदारीची जाणीव करून देत असते. त्यामुळे सातारा पालिकेतर्फे ‘प्रतापसिंह महाराज स्मृती’ पुरस्कार दिल्याने मला माझ्या जबाबदारीत आणखी भर घातली आहे. ज्यांच्या नावाने पुरस्कार दिला गेला ते प्रतापसिंह महाराज अनेक कारणांनी मोठे होते. त्यांच्याबद्दल इंग्रजांमध्येही आदर होता. त्यांचे चरित्र जगासमोर येणे गरजेचे आहे. या चरित्राचे हिंदी, इंग्रजीतूनही भाषांतर झाल्यास ते जगासमोर जाणार आहे. इंग्रजांनी सर्वांना छळले असताना केवळ सातारा जिल्ह्यातच प्रतिसरकार निर्माण होऊ शकले. जीवन विमा महामंडळ, रयत शिक्षण संस्थांसारखे अनेक अमूल्य ठेवा साताराने राज्याला, देशाला दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.’ (प्रतिनिधी)