शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

प्रतापसिंह उद्यानामुळे साताऱ्याच्या लौकिकात भर

By admin | Updated: October 7, 2016 00:14 IST

उदयनराजे : यादोगोपाळ पेठेत उद्यानाचे भूमिपूजन; ‘नाईन-डी शो’ पाहण्याची सुविधा, चिमुकल्यांसाठी पर्वणी

सातारा : ‘नगरसेविका दीपाली गोडसे यांच्या पाठपुराव्यामुळे सत्यात उतर असलेले यादोगोपाळ पेठेतील दिवंगत प्रतापसिंह महाराज ऊर्फ दादा महाराज उद्यान साताऱ्याच्या लौकिकात भर घालेल,’ असा विश्वास खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.यादोगोपाळ पेठेत, तालिमखान्यासमोर पालिकेच्या वतीने प्रतापसिंह महाराज ऊर्फ दादा महाराज उद्यान उभारण्यात येत आहे. त्याचे भूमिपूजन ‘नक्षत्र’च्या संस्थापिका दमयंतीराजे भोसले यांच्या हस्ते झाले. त्यावेळी खासदार उदयनराजे बोलत होते. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, नगराध्यक्ष विजय बडेकर, उपनगराध्यक्ष जयवंत भोसले, नगरसेविका दीपाली गोडसे आदी उपस्थित होते.उदयनराजे म्हणाले, ‘अनेक वर्षांपासून या ठिकाणी उद्यानासाठी आरक्षित जागा विकासाविना पडून होती. दीपाली गोडसे यांनी लक्ष घालून पाठपुरावा सुरू केला. त्याला यशही आले. त्यांच्यामुळेच आज या ठिकाणी बगिचाचा विकास होत आहे. एखाद्या कामाचा किती पाठपुरावा करावा, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणून गोडसे यांच्याकडे पाहता येईल. ‘नाईन-डी शो’ पाहण्याची सुविधा या उद्यानामुळे सातारा शहरच नव्हे तर जिल्हावासीयांना उपलब्ध होणार आहे. मुंबईतील तारांगणच्या धर्तीवर छोटेखानी तारांगण, खुला रंगमंच, सायकल ट्रॅक, मुलांसाठी खेळणी अशी विरंगुळ्याची बरीच साधने सातारकरांसाठी उपलब्ध होणार आहेत.’दमयंतीराजे म्हणाल्या, ‘घरात लहान मुलांना आपण जास्त टीव्ही पाहू नकोस, सारखा मोबाईलवर खेळू नकोस अशा सूचना करत असतो. परंतु मुलांना करमणुकीसाठी चांगले पर्याय आपण देत नाही. सातारकरांची ही गरज ओळखून दीपाली गोडसे यांनी एका चांगल्या उद्यानाच्या निर्मितीचे काम हाती घेतले आहे.’दीपाली गोडसे म्हणाल्या, ‘खासदार उदयनराजे व आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या खंबीर पाठबळामुळेच आपण उद्यानाच्या उभारणीसाठी पुढाकार घेतला. जागा ताब्यात घेण्यापासून निधीच्या मंजुरीपर्यंत अनेक तांत्रिक अडथळे आले. मात्र, इच्छा असली की मार्ग निघतो. या उक्तीप्रमाणे हे अडथळेही बाजूला होत गेले. (प्रतिनिधी)