शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

प्रीतिसंगम बागेला मिळणार झळाळी

By admin | Updated: April 11, 2016 00:50 IST

कामास प्रारंभ : तीन कोटी खर्चातून नूतनीकरणाचे काम; दर्जेदार सुविधा निर्माण होणार

कऱ्हाड : शहरात उभारण्यात आलेल्या सार्वजनिक उद्यानामुळे शहरातील सौंदर्यातही भर पडते. तर नागरिकांसाठी विरंगुळ्याचे ठिकाण म्हणून उद्यानाकडे पाहिले जाते. याच हेतूने यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळालगत पालिकेच्या वतीने ३२ वर्षांपूर्वी स्वामीबाग उभारण्यात आली. या बागेच्या नूतनीकरणाचे काम पालिकेच्या वतीने सध्या हाती घेण्यात आले आहे. सुमारे तीन कोटी रुपये खर्च करून बागेत अनेक दर्जेदार सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. त्यामुळे नूतनीकरणानंतर आता या बागेला नवीन झळाळी निर्माण होणार आहे.कऱ्हाड पालिकतर्फे शहरातील चार ठिकाणी नागरिकांसाठी व चिमुकल्यांसाठी उद्याने उभारण्यात आली आहेत. त्यामध्ये यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळावर ‘स्वामीबाग’, सावरकर पुतळा परिसरात ‘नाना-नानी पार्क’, सुपरमार्केट परिसरात ‘पी. डी. पाटील’ उद्यान तर यशवंतरावचव्हाण स्मृतिसदन परिसरातील उद्यान अशा चार ठिकाणी विविध फुलझाडांसह आकर्षक खेळण्यांची उद्याने उभारण्यात आली आहेत. पी. डी. पाटील यांच्या पुढाकाराने यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळ परिसरामध्ये १९८४ मध्ये ‘प्रीतिसंगम’ बाग उभारण्यात आली. या बागेला सुमारे ३२ वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, त्याच्या देखभाल व दुरुस्तीला पालिकेचा कमीच खर्च लागतो. तर दुसरीकडे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी महोत्सवीवर्षाअंतर्गत शंभर कोटी निधीतून पालिकेला तीन कोटी निधी उपलब्ध करून दिला. त्यातून या स्वामीबागेचे नूतनीकरण केले जात आहे.३२ वर्षांनंतरही बागेत बदल करण्याची गरज नसल्याचे नागरिकांकडून सांगितले जाते. मात्र, बागेतील असलेल्या गवताच्या लॉनचे मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थांमुळे व मुंग्यांमुळे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे लहान मुलांच्या खेळण्यासाठी तयार करण्यात आलेल्या गार्डनमधील खेळण्यांचीही मोडतोड झालेली आहे. त्याठिकाणीही नव्याने खेळण्यांचे साहित्य बसविण्यात येणार आहे.नव्याने नूतनीकरण करण्यात येत असलेला बागेच्या ठिकाणी मूळचा बागेचा ढाचा तसाच ठेवला जाणार आहे. त्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, बागेत गवताचे लॉन, मातीचे लॉन, आकर्षक फुलझाडे, पाणी मारण्यासाठी स्प्रिंकलर, एलईडी बल्बाद्वारे आकर्षक विद्युत रोषणाई अशा सुविधा बागेत उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे कऱ्हाडमधील ही बाग अधिक चांगली होणार आहे. कऱ्हाडकरांचे पाय इकडे वळणार आहेत. (प्रतिनिधी)बत्तीस वर्षांपूर्वीची बागकऱ्हाड येथे अनेक वर्षांपासूनची व आजही चांगल्या स्थितीत असलेली अनेक ठिकाणे आहेत. त्यामधील एक ही यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळ परिसरातील ‘स्वामीबाग’ आहे. १९८४ मध्ये बांधण्यात आलेल्या बागेला सध्या बत्तीस वर्षे पूर्ण होत आहेत. त्या बागेच्या नूतनीकरणास सध्या सुरुवात करण्यात आलेली आहे.