शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

बलाढ्य राष्ट्रवादी काँग्रेसवर आत्मचिंतनाची वेळ!

By admin | Updated: March 3, 2017 23:42 IST

कोरेगाव दक्षिण : अंतर्गत विरोध कोठेतरी थांबविण्याची गरज; निष्ठावंतांचे मत

साहिल शहा ल्ल कोरेगावतालुक्याच्या दक्षिण भागात नेहमीच बलशाली असलेल्या आणि सातत्याने विविध संस्थांवर सत्ता असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पक्षांतर्गत विरोधामुळेच ताकद असून देखील राष्ट्रवादी यश मिळवू शकली नाही, याचे निष्ठावंत कार्यकर्त्यांना शल्य आहे. पक्षांतर्गत असलेला विरोध कोठेतरी थांबला पाहिजे, अन्यथा पक्षाची अवस्था बिकट होण्याची शक्यता निष्ठावंतांमधून व्यक्त होत आहे. एकूणच कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदार संघाचे बुरुज ढासळू लागले असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसवर आत्मचिंतनाची वेळ आली आहे. दक्षिण भाग हा नेहमी राष्ट्रवादीची विचारधारा मानणारा विभाग. या विभागातील विविध सत्तास्थानांवर आजवर राष्ट्रवादीची पकड राहिली आहे. पक्षाने आदेश द्यायचा आणि त्याचा निकालच घेऊनच जायचा, अशी आजवर येथे परिस्थिती होती. मात्र, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पक्षानेच पक्षाचा पाडाव का केला, याचे कोडे मात्र निष्ठावंतांना अद्याप उलगडलेले नाही. रहिमतपूर नगरपालिकेवर कायम सत्ता असलेल्या सुनील माने यांच्याकडे पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा आहे, त्यांनी या निवडणुकीत चांगलेच लक्ष घातले होते. मात्र, विजयाची शक्यता असताना अचानक पक्षाला पराभव स्वीकारावा लागला आहे. संभाजीराव गायकवाड हे राजकीय धुरंधर नेतृत्व. शांत व संयमी असलेल्या तात्यांना थेट पवारांचा आशीर्वाद असल्याने आजवर त्यांनी राजकीय जीवनात अनेक पदे भूषविली आहेत. त्यांनी या निवडणुकीत उमेदवारीची अपेक्षा केल्यानंतर थेट बारामतीतून त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आणि तेथूनच इच्छुकांमध्ये नाराजीची लाट उसळली. गायकवाड व सुनील माने यांना ही लाट लक्षात आली होती, त्यांनी पक्षाच्या वरिष्ठांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती. मात्र, वरिष्ठांनी जेवढे लक्ष द्यायला हवे होते, तेवढे न दिल्याने पक्षांतर्गत ताकद एकवटली नाही आणि परिणामी या निवडणुकीत राष्ट्रवादी म्हणावी, अशी आक्रमक झाली नाही. प्रचार यंत्रणेत देखील सुसूत्रता नसल्याने पक्षाचे अस्तित्व म्हणावे असे राहिले नाही. वाठार किरोली जिल्हा परिषद गटात नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये पक्षाची मोठी ताकद होती. मात्र, अंतर्गत नाराजी दूर झाली नाही, रुसवे-फुगवे निघाले नाहीत आणि लोकप्रतिनिधींनी म्हणावे असे लक्ष केंद्रित केले नाही. त्यामुळे यशाच्या टप्प्यावर असलेल्या राष्ट्रवादीला मोठ्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले. आजवर कऱ्हाड उत्तर मतदार संघात शिस्तबद्ध आणि पक्षाच्या आदेशाला किंमत देणारी राष्ट्रवादी ऐन निवडणुकीत तोंडघशी पडली असल्याने त्याचा विपरित परिणाम २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत दिसून येऊ शकतो, असे निष्ठावंतांचे म्हणणे आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांची वेळीच नाराजी दूर केली असती तर निकाल वेगळा दिसला असता, असेही निष्ठावंतांचे म्हणणे आहे.