शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या प्रचारात जोरदार शक्तिप्रदर्शन

By admin | Updated: April 6, 2016 00:20 IST

चर्चेला चोख प्रतिउत्तर देत आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोणंद शहरात भव्य रॅली काढण्यात आली.

लोणंद : लोणंद नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने भव्य शक्तिप्रदर्शन करीत प्रचाराचा नारळ फोडला. तीन प्रभागात राष्ट्रवादीला उमेदवार नसल्याने पक्ष कमकुवत झाल्याच्या चर्चेला चोख प्रतिउत्तर देत आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोणंद शहरात भव्य रॅली काढण्यात आली.राष्ट्रवादी काँग्रेसने लोणंद नगरपंचायतीपासून प्रचाररॅलीला प्रारंभ केला. संपूर्ण शहरात झेंडे, पताका घेऊन मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी प्रचार फेरी पूर्ण केली. यावेळी मिलिंद पाटील, आनंदराव शेळके, नितीन भरगुडे-पाटील, दत्तानाना ढमाळ, रमेश धायगुडे, मनोज पवार, राजेंद्र तांबे, स्नेहलता शेळके, नंदा गायकवाड, विश्वास शिरतोडे, भरत शेळके, विठ्ठल शेळके, प्रदीप क्षीरसागर, नाना जाधव, एन. डी. क्षीरसागर सहभागी झाले.आमदार पाटील म्हणाले, ‘पहिल्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विजयासाठी चंग बांधला आहे. राष्ट्रवादी पहिल्याच प्रयत्नात मागे पडल्याच्या अफवा पसरवणाऱ्यांनी लक्षात घ्यावे. बॅकफूटवरून फ्रंट फूटला एका रात्रीत कसे यायचे याची क्षमता आमच्याकडे आहे. सत्तेच्या जीवावर मतांचा जोगवा मागण्याचे काम करत आहेत. राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी दक्षपणे राहून काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)मकरंद पाटील यांच्या काठीचा लोणंदमध्ये जलवाआमदार मकरंद पाटील यांनी विधानसभेचा पहिला विजय चालण्याच्या काठीच्या चिन्हावर मिळविला होता. लोणंद नगरपंचायतीत त्यांना मानणाऱ्या अपक्ष उमेदवारांनी ‘काठी’ चिन्ह घेण्याकडेच कल दाखविला. काठी चिन्ह मिळविण्यासाठी चुरस लागली होती. तसेच लोणंद सोसायटीतही ‘काठी’चाच विजय झाला होता. त्यामुळे मकरंद पाटील यांच्या काठीचा जलवा अजूनही लोणंदमध्ये दिसून येतोय.