शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेनं लावलं लोकांना कामाला!

By admin | Updated: June 22, 2015 23:02 IST

सातारा : रस्त्यावर भर टाकण्यासाठी नागरिकांचाच पुढाकार

सातारा : पावसाळ्यापूर्वी कामे मंजूर होऊन देखील नगरसेवकांच्या दुर्लक्षामुळे ती पूर्ण झाली नाहीत. त्याचा फटका मात्र सर्वसामान्यांना बसत आहे. ठिकठिकाणी खड्डे मुजविण्यासाठी खडी आहे; पण काम करणारे मजूर नसल्याने शेवटी नागरिकांनीच हाती पाटी घेऊन भर टाकण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे नागरिकांनाच पालिकेनं लावलं कामाला,’ अशी चर्चा सुरू झाली आहे.सातारा पालिकेने पावसाळापूर्व कामांना मंजुरी दिली आहे. परंतु ही कामे पावसाळा सुरू होऊन देखील रखडली आहेत. येथील जुना मोटार स्टॅण्ड ते सुमित्राराजे व्यापारी संकुल जवळील रस्ता पूर्ण उखडला आहे. तर विविध कामांसाठी खणलेल्या रस्त्यावर भरही टाकली नसल्याने सध्या हा रस्ता पाऊस आणि पाण्याने जलमय झाला आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर पालिकेने मागील आठवड्यात येथे दगड खडी आणून टाकली आहेत. परंतु कामाची सुरुवात मात्र झाली नाही.दरम्यान, जुना मोटार स्टॅण्ड जवळील या परिसरात सतत वर्दळ असते. त्यामुळे या रस्त्यावरून हजारोंच्या संख्येने नागरिकांची ये-जा असते तर अनेक व्यावसायिक या रस्त्यावर आपला व्यवसाय करत आहेत. मागील दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाचे पाणी येथील खड्ड्यात मोठ्या प्रमाणात साचले आहे. साचलेल्या पाण्यातून वाहने जाऊन हे पाणी येथील व्यावसायिकांच्या मालावर पडत असून,नुकसान होत आहे. त्यामुळे हे काम लवकरात लवकर करण्याची मागणी नागरिकांनी करूनदेखील पालिका दुर्लक्ष करीत आहे. म्हणून नागरिकांनीच पालिकेने टाकलेली खडी स्वत: उचलून खड्ड्यात टाकण्यास सुरूवात केली आहे. येथील रस्त्यांवरील खड्यांबाबत संबंधित नगरसेवकांनी वेळीच लक्ष दिले असते तर हे काम वेळेत पूर्ण झाले असते; परंतु नगरसेवकच लक्ष देत नसल्याने पालिकेचे काम आम्हाला करावे लागत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. तसेच नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिय तीव्रपणे मांडून नगरसेवकांबद्दल नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी) नगरसेवकांचं दुर्लक्ष...जुना मोटार स्टॅण्ड, जुनी भाजी मंडई परिसर हा दोन वॉर्डाच्या हद्दीत येत असल्याने पालिकेत मातब्बर समजल्या जाणाऱ्या नगरसेवकांचे या भागात दुर्लक्ष होत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. पावसाळ्यापूवीर्ची मंजूर कामे केली जात नसल्याचा प्रकार येथे पाहायला मिळत आहे. रस्त्यावर खडी-डबर येऊनदेखील केवळ नगरसेवकांच्या दुर्लक्षतेमुळे रस्त्यावरून चालणेही आता मुश्किल झाले आहे.मागील अनेक वर्षे मी या परिसरात भाजी मंडई व इतर साहित्य खरेदीसाठी येतो. अनेक पावसाळे पाहिले; परंतु हा परिसर सतत खड्ड्याने भरलेला दिसतो. ‘रस्ता कमी अन् खड्डे जास्त,’ अशी या रस्त्यांची खासियत असून, याचा अनुभवही आता वर्षानुवर्षांचा झाला आहे.- विवेक भोसले, नागरिक (वाहनचालक)