शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

वीज कर्मचाऱ्याचा जीव ‘टेस्टर’च्या भरवशावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:41 IST

कऱ्हाड : बटण दाबले की बल्ब लागतो; पण बल्ब पेटायला वीज लागते. हीच वीज अखंडित ठेवण्याचे काम महावितरणचे कर्मचारी ...

कऱ्हाड : बटण दाबले की बल्ब लागतो; पण बल्ब पेटायला वीज लागते. हीच वीज अखंडित ठेवण्याचे काम महावितरणचे कर्मचारी आणि जनमित्र करतात. खरेतर त्यांचे हे काम म्हणजे तारेवरची कसरत. तिथे चुकीला माफी नाही. एक चूक जीवघेणी ठरू शकते. अनेकवेळा असे जीव गेलेतही; पण बळी जाऊनही वीज कर्मचारी आणि जनमित्रांच्या सुरक्षेबाबत म्हणावे तेवढ गांभीर्य दिसत नाही, हे दुर्दैव.

कऱ्हाड तालुक्यातील चचेगावच्या इंद्रजित थोरात या जनमित्राचा बुधवारी नाहक बळी गेला. आणे येथे वीज वाहिन्यांमधील बिघाड दुरूस्त करण्यासाठी खांबावर चढलेल्या इंद्रजितला विजेचा धक्का बसला. तो खांबावरून खाली फेकला गेला. रुग्णालयात तीन दिवस त्याची मृत्युशी झुंज सुरू होती. अखेर ३१ मार्चला त्याचा मृत्यू झाला. ५ मार्च रोजी काढणे येथे तंत्रज्ञ विशाल कदम यांचाही नाहक बळी गेला होता. तर ४ जानेवारी रोजी मुंढे येथे शंकरराव साळवे यांना ट्रान्सफॉर्मरची दुरूस्ती करताना आपला जीव गमवावा लागला. एकापाठोपाठ घडलेल्या या तिन्ही घटनांतून वीज कर्मचाऱ्यांची असुरक्षितता अधोरेखित होते.

वीज कर्मचारी अथवा जनमित्राबाबत एखादी दुर्घटना घडल्यानंतर चूक कोणाची, याबाबत नेहमीच चर्चा होते. मात्र, अशी घटना घडूच नये, यासाठी कोणतीही उपाययोजना होताना दिसत नाही. अनेक ठिकाणी धोकादायक परिस्थितीत वीज कर्मचारी आणि जनमित्र काम करतात. त्यांच्याकडे पुरेशी सुरक्षात्मक साधने नसतात. असलीच तरी त्याचा वापर ते करीत नाहीत. त्यामुळे दुर्घटनेला निमंत्रण मिळते. वीज वाहिन्या, फ्यूजबॉक्स, फिडरच्या ठिकाणी काम करताना वीज अधिकाऱ्यांसह वायरमन उपस्थित असेल तरच जनमित्राने काम करावे, असे सांगितले जाते. मात्र, अनेकवेळा वायरमन अथवा अधिकारी उपस्थित नसताना काही जनमित्र अती आत्मविश्वासातून काम करण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळीही दुर्घटना घडण्याची जास्त शक्यता असते.

- चौकट

जनमित्रांना पुरविली जाणारी साधने

१) टेस्टर

२) ग्लोव्हज

३) अर्थिंग रॉड

- चौकट

का घडतात दुर्घटना..?

१) वीज वाहिन्यांचा गुंता

२) तुटलेले, मोडलेले फ्यूजबॉक्स

३) फ्यूजमध्ये कोंबलेल्या तारा

४) गंजलेले, वाकलेले खांब

५) अती आत्मविश्वास

६) अनुभवाचा अभाव

७) वीज पुरवठ्याची अपुरी माहिती

- चौकट

आधुनिक टेस्टर फायदेशीर; पण...

वीज कर्मचारी आणि जनमित्रांना दिले जाणारे आधुनिक ‘टेस्टर’ फायदेशीर आहे. वीज प्रवाह सुरू असेल तर काही अंतरावरच त्याची पूर्वसूचना त्या टेस्टरमार्फत मिळते. मात्र, संबंधित ‘टेस्टर’ बॅटरीवर चालते. जर बॅटरी खराब झाली अथवा ‘डिस्चार्ज’ असेल तर ‘टेस्टर’ पूर्वसूचना देत नाही. त्यामुळे वीज कर्मचारी आणि जनमित्रांच्या जीवाला आणखी धोका उद्भवू शकतो.

- कोट

कऱ्हाड उपविभागातील जनमित्रांना पुरेसे प्रशिक्षण दिले जाते. त्याबरोबरच त्यांना सुरक्षेबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या जातात. अधिकारी अथवा मुख्य वायरमन असल्याशिवाय त्यांनी कोणतेही काम करायचे नाही. त्याबाबतही जनमित्रांना सूचित केले आहे.

- अभयसिंह पाटील

अध्यक्ष, विद्युत बहुउद्देशिय स्वयंरोजगार संस्था

फोटो : ०१केआरडी०४

कॅप्शन : वीज कर्मचाऱ्यांसह जनमित्रांना आपला जीव धोक्यात घालून विद्युत वाहिन्यांची कामे करावी लागतात. कऱ्हाड तालुक्यातील मसूर येथील छायाचित्र.