शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर पोस्ट ठेवताय, पण जरा जपून...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:40 IST

खंडाळा : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार काही केल्या कमी होताना दिसत नाही. रुग्णांना बेड उपलब्ध करताना नातेवाइकांची कसरत होत ...

खंडाळा : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार काही केल्या कमी होताना दिसत नाही. रुग्णांना बेड उपलब्ध करताना नातेवाइकांची कसरत होत आहे. अनेक रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याची वेळ येत आहे. त्यातच एखादा व्यक्ती गतप्राण झाल्यावर त्यांच्या श्रद्धांजली पोस्ट टाकण्यात नेटकरी अग्रेसर राहतात, पण हीच पोस्ट रुग्णालयातील रुग्णाच्या पाहण्यात आल्यास, तो धक्का रुग्णांना धोकादायक ठरत आहे. तेव्हा नेटकऱ्‍यांनो सोशल मीडियावर पोस्ट ठेवताना जरा जपूनच ठेवा.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात प्रसाराचा वेग चांगलाच वाढला आहे. प्रतिदिन दोन हजारांपेक्षा अधिक लोक बाधित होत आहेत. ज्या कुटुंबातील व्यक्ती बाधित होत आहेत, त्यांच्यावर मोठी जबाबदारीची वेळ येत आहे. आपल्या रुग्णाला चांगल्या रुग्णालयात उपचार मिळावेत, यासाठी बेड मिळविण्याची धडपड करावी लागत आहे. त्यातच दुसऱ्या लाटेतील कोरोनाचा स्टेन अधिक घातक असल्याचे स्पष्ट होत आहे. मृत्यूचे प्रमाणही वाढल्याचे दिसून येत आहे. रुग्णांना अचानक त्रास वाढणे, श्वसनास त्रास होणे, ऑक्सिजन पातळी घटणे असे प्रकार घडत असल्याने, त्याची भीती बाधितांना मोठ्या प्रमाणात आहे. रुग्णांनी जास्त धसका घेतला, तर तब्बेत सुधारणे आणखी बिकट होत आहे. त्यामुळे आपल्या रुग्णाने धसका घेऊ नये, यासाठी नातेवाईक, वैद्यकीय कर्मचारी काळजी घेत असतात. त्यातच एकाच कुटुंबातील अनेक जण बाधित झाल्यास त्यांना मिळेल त्या रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. त्यांना एकमेकांची काळजी लागून राहते, परंतु अशा वेळी त्या कुटुंबातील, गावातील, पाहुण्यातील कोणी कोरोनाने दगावल्यास त्यांना फेसबुक, व्हॉट्सॲप, स्टेटसवर श्रद्धांजली वाहण्यात अनेक जण अग्रेसर राहतात किंवा कोरोनाविषयी भीतिदायक मजकूर व्हायरल केला जातो. याच पोस्ट रुग्णांनी दवाखान्यात पाहिल्यास त्याचा विपरित परिणाम त्यांच्यावर होत असतो. त्यामुळे नेटकऱ्‍यांनी सध्याच्या काळात याबाबत समयसूचकता बाळगणे गरजेचे आहे.

चौकट..

हे करू नका -

१ ) कोरोनाची वाढती आकडेवारी शेअर करू नका.

२ ) भीतिदायक मेसेज करू नका.

३ ) कोणत्याही मयत व्यक्तीचा श्रद्धांजली फोटो ठेवू नका.

४ ) औषधोपचार तुटवडा अथवा अन्य मजकूर पसरवू नका.

हे जरूर करा -

१ ) सकारात्मक विचार ठेवा.

२ ) रुग्णांचे मनोबल वाढेल, असे मेसेज करा.

३ ) दररोज कोरोनामुक्त रुग्णांचे आकडे ठेवा.

४ ) उपलब्ध सोयी त्यांच्यापर्यंत पोहोचवा.

(चौकट..)

सकारात्मक विचार करायला हवा...

कोरोनाचे उपचार घेत असलेल्या रुग्णांची औषधोपचाराबरोबरच मानसिक स्थिती प्रबळ राखणे खूप महत्त्वाचे आहे. रुग्णांनी देखील आपण कोरोनाशी लढा देऊन त्यावर यशस्वी मात करू शकतो, असाच विचार ठेवणे गरजेचे आहे. माझे कसे होईल याची चिंता न करता मी चांगला होणारच हा सकारात्मक विचार करायला हवा. रुग्णाची मानसिकता चांगली राहिली तर उपचाराला शरीर साथ देते, त्यामुळे बरे होण्याचे प्रमाण वाढू शकते.

..........................................